पेनूर गावात राहणारे शेतकरी भारत शिंदे यांनी 5 वर्षांपूर्वी उमरान आणि चमेली या दोन्ही बोरांच्या झाडांची मिक्स लागवड केली आहे. अर्ध्या एकरामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक रोपांची लागवड केली आहे. लागवडीसाठी पाच वर्षांपूर्वी भारत शिंदे यांना 50 हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. लागवडीच्या पहिल्या वर्षी बोरांपासून 1 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. तर शिंदे यांनी बोरांच्या झाडांची व्यवस्थित छाटणी केली असून उमरान आणि चमेली या बोरांच्या झाडांपासून दरवर्षी अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
advertisement
packed food ला आरोग्यदायी पर्याय! ग्रो हेल्दी फूडचे अनेक पदार्थ बाजारात Video
बोरांच्या झाडांवर भुरी हा रोग होऊ नये याची विशेष काळजी भरत शिंदे घेत असून वेळोवेळी त्यावर फवारणी करत आहेत. बोरांची तोडणी करून विक्रीसाठी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी पाठवले जात आहे. बाजारामध्ये सध्या उमरान चमेली बोरांना 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
मधल्या काळात पुणे येथील बाजारात या बोरांना 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. द्राक्षाची शेती किंवा इतर पिकांची शेती करण्यापेक्षा बोरांची शेती परवडत असून पहिल्याच वर्षी लागवडीचा खर्च वजा करून दरवर्षी अडीच ते तीन लाखांचा नफा शेतकरी भरत शिंदे यांना मिळत असून पाच वर्षांमध्ये दहा लाखांचा नफा या बोराच्या बागेपासून भरत शिंदे यांना मिळाला आहे.





