श्वेता तिवारीने १९९८ साली राजा चौधरीशी लग्न केलं होतं. हे लग्न लव्ह मॅरेज होतं आणि ती तिच्या घरातील पहिली मुलगी होती जिने इंटरकास्ट विवाह केला. मात्र या लग्नानंतर श्वेताच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर २०१२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
advertisement
पण श्वेताने या घटस्फोटाची मोठी किंमत मोजली. एका मुलाखतीत श्वेताने सांगितलं की, "मला पोटगी म्हणून काहीच मिळालं नाही, उलट मीच ९३ लाखांची प्रॉपर्टी राजा चौधरीच्या नावावर केली. फक्त घटस्फोटासाठी." तिच्या म्हणण्यानुसार, तिने आणि राजाने जे घर एकत्र घेतलं होतं, ते राजा स्वतःच्या नावावर मागत होता. श्वेताने सुचवलं होतं की ते घर त्यांच्या मुली पलकच्या नावावर करावं, पण राजाने स्पष्ट शब्दात नकार दिला.
श्वेताने पुढे सांगितलं, "मी हादरले होते जेव्हा त्याने म्हटलं, ‘मुलगी नको, पण घर हवं!’". हा क्षण तिच्या आयुष्यातील एक मोठा धक्का होता.
यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं, मात्र हे नातंही फार काळ टिकलं नाही. २०१९ मध्ये तिने दुसरा घटस्फोट घेतला. दोन्ही लग्नांमधून तिला एक मुलगी पलक, आणि एक मुलगा रेयांश आहे. एका दुसऱ्या मुलाखतीत श्वेताने म्हटलं की, "प्रत्येक वेळी मी नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. पण एक वेळ येते, जेव्हा तुमचं स्वतःचं भलं करण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावेच लागतात."