मराठी संस्कृतीचा मान वाढवला!
साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट कृष्ण-धवल काळातली कथा सांगतो. या चित्रपटात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर आणि इतर कलाकारांनी खूप चांगली भूमिका साकारली आहे.
‘श्यामची आई’ चित्रपटाच्या निर्मात्या अमृता अरुणराव यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी खास निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या मराठमोळ्या अंदाजाने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान वाढवला.
advertisement
१९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'श्यामची आई' या चित्रपटाला पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रपतीतर्फे सुवर्णपदक मिळाले होते. अशाप्रकारे साने गुरुजी यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटांना दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
शाहरुख, राणी आणि मोहनलाल यांनाही पुरस्कार!
या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानलाही त्याच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला. तर अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना देण्यात आला आहे.