सिद्धार्थ सध्या त्याच्या आगामी क्रांतीज्योती मराठी माध्यम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तो त्याच्या आईला भेटला. त्याची आई त्याच्यासाठी वेळ काढून धावत पळत त्याला भेटायला आली. पाच मिनिटांसाठी भेटायला आलेल्या आईनं सिद्धार्थच्या हातावर एक खास पदार्थ ठेवला. तो पदार्थ पाहून सिद्धार्थ खूपच इमोशनल झाला. सिद्धार्थनं व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्यात.
advertisement
(माधुरी दीक्षितची ऑनस्क्रीन सून, सिद्धार्थ चांदेकरसोबतच्या बोल्ड सीनने उडवली खळबळ, ती आहे कोण? )
सिद्धार्थनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की सिद्धार्थला भेटण्यासाठी त्याची आई घाई घाईनं येतेय. सिद्धार्थनं व्हिडीओमध्ये लिहिलंय, काल अगदी 5 मिनिटांसाठी आई धावत धावत मला भेटायला आली. गूळ तूप पोळीचा लाडू घेऊन. शाळेत जाताना आईने प्रेमाने बनवून दिलेला डबा आठवला. आईने दिलेली ही गोड भेट पाहून सिद्धार्थ इमोशनल झाला.
सिद्धार्थला आईला भेटून शाळेचे दिवस आठवले. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, शाळेच्या gathering ला आपण स्टेज वर नाचत असताना खाली प्रेक्षकांमध्ये आई दिसली की कसा आनंद व्हायचा! तसा अजूनही होतो! सिद्धार्थ आणि सिद्धार्थच्या आईमध्ये असलेलं प्रेम, त्यांचं बॉन्डिंग हे सगळं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
सिद्धार्थचा व्हिडीओ पाहून त्याने फॅन्स देखील इमोशनल झालेत. अनेक कलाकारांनी आणि फॅन्सनी सिद्धार्थच्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.
सिद्धार्थच्या आईचं नाव सीमा चांदेकर असून त्या देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. अनेक मराठी नाटकं, सिनेमा आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी मिलाती मयेकर यांनी काही वर्षांआधीच त्याच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं. सीमा यांच्या दुसऱ्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. सिद्धार्थनं आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं.
