सोनू सूदने पकडला ४ फुटांचा साप!
एक दमदार अभिनेता आणि माणूस म्हणून सोनू सूदची ओळख आहे. आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तो खासगी आयुष्यातही नेहमीच चर्चेत असतो. शनिवारी २० जुलैला त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो एक मोठा साप पकडताना दिसत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने श्रावण महिन्याचं निमित्त साधत 'हर हर महादेव' असं लिहिलं आहे. व्हिडिओमध्ये सोनू म्हणतोय, "हा एक रॅट स्नेक आहे आणि हा बिचारा आमच्या सोसायटीत घुसला आहे. हा बिनविषारी साप असतो, पण याला काळजीपूर्वक पकडणं खूप महत्त्वाचं आहे. मला पकडता येतं, म्हणून मी त्याला पकडलं आहे." तो पुढे इशाराही देतो, "पण तुम्ही मात्र संरक्षणात्मक उपाय न करता याला पकडण्याची चूक करू नका." या निष्पाप प्राण्याला आता त्याच्या परिसरात सोडून येणार असल्याचं सोनूने सांगितलं. अशाप्रकारे सोनू सूदने साप पकडण्याच्या या संपूर्ण घटनेचं वर्णन केलं आहे.
advertisement
'तो माझ्यासाठी...', 'डॉन' सिनेमाच्या दिग्दर्शकाचं निधन, अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, म्हणाले...
'यालाही घरी सोडून येणार का?' नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स!
सोनू सूदच्या हातात दिसणारा हा साप सुमारे ४ फुटांपेक्षा जास्त लांब असल्याचं म्हटलं जातंय. इतक्या मोठ्या सापाला त्याने कोणतीही इजा न पोहोचवता ज्याप्रकारे पकडलं आहे, ते पाहून सोशल मीडियावर चाहते त्याच्या धाडसाची प्रशंसा करत आहेत.
याशिवाय काही युझर्सनी सोनू सूदच्या या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स करत त्याच्या नेहमीच्या मदतीच्या स्वभावाची फिरकी घेतली आहे. एकाने त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं आहे, "सर, तुम्ही ह्याला पण त्याच्या घरी सोडून आलात का ?" दुसऱ्याने लिहिलंय, "तुम्ही सर खूप चांगले आहात, सर्वांना त्यांच्या घरापर्यंत सोडून येता." तर एका चाहत्याने म्हटलं आहे, "सोनू सूद सरांनी आज पुन्हा काहीतरी वेगळं केलं आहे. जिथे लोक साप पाहून पळून जातात, तिथे सोनू सूदने स्वतःच्या हातांनी जिवंत साप धरून लोकांना दाखवलं. घाबरू नका आणि भीती बाळगू नका. अगदी खऱ्या हिरोसारखे. फक्त चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करू नका. तुम्ही खऱ्या आयुष्यात हिरो आहात! चित्रपटांमध्येही हिरो व्हा."
सोनू सूदचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्याच्या या धाडसी कृतीची आणि त्यावरील चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा आहे.