सुनिधी चौहान म्युझिक इंडस्ट्रीतील टॉप गायकांपैकी एक आहे, जिने इंडस्ट्रीला एक-दोन नव्हे तर अनेक हिट गाणी दिली आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत आणि अनेक रिॲलिटी शोमध्ये ती जज म्हणूनही दिसली आहे. आता सुनिधी चौहानने या सिंगिंग रिॲलिटी शोबद्दल शॉकिंग खुलासे केले आहेत.
'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' होती ही पाकिस्तानी अभिनेत्री; भारतात टॉपलेस फोटोशूट करत उडवून दिली खळबळ
advertisement
सुनिधीने राज शामानीच्या पॉडकास्टमध्ये रिॲलिटी शोबद्दल खुलेपणाने चर्चा केली. गेल्या काही वर्षांपासून रिॲलिटी शोजवर हे शो स्क्रिप्टेड असून त्यांचे विजेते आधीच ठरवले जात असल्याचा खुलासे केले आहेत. आता स्वत: प्रसिद्ध सिंगिंग रिॲलिटी शोची जज राहिलेली सुनिधी चौहान आता शोमध्ये होणाऱ्या या आरोपांबद्दल उघडपणे बोलली आहे.
जेव्हा होस्टने सुनिधीला विचारले की, तुला असे वाटते की रिॲलिटी शो आता खरे नाहीत, तेव्हा सुनिधी सहमत झाली आणि म्हणाली, 'रिॲलिटी शो आता खूप बदलले आहेत, पण पूर्वी असं नव्हतं. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या दोन सीझनमध्ये एकही स्टोरी नसायची. मस्ती व्हायची, कुणीतरी वाईट गायक यायचे, ज्यांना आम्ही म्हणायचो, तू पुढच्या सिझनला ये. हे सर्व स्क्रिप्टेड असायचं. पण, तुम्ही जे ऐकत आहात तेच खरं असायचे.'
सुनिधी पुढे म्हणाली, 'पण, आता तुम्ही टीव्हीवर जे काही बघता ते सर्व स्क्रिप्टेड असतं.' असा खुलासा केला आहे.
तो पुढे म्हणाला, 'या सर्व गोष्टींचा मला त्रास होऊ लागला, त्यामुळे मी रिऍलिटी शोमध्ये भाग घेणं बंद केलं. मग मी 'द व्हॉईस' केला, ज्यामध्ये मी माझ्या काही अटी ठेवल्या आणि त्यांनीही माझ्या अटी मान्य केल्या. त्या शोमध्ये मी जे काही ऐकत होते ते प्रेक्षकांनाही ऐकू येत असल्याचं समाधान होतं. मला ही फसवणूक सहन होत नाही, म्हणून मी या शोचा भाग होते याचा मला आनंद आहे, पण आता मी या शोचा भाग नाही. हे 'ऐ दिल है हिंदुस्तानी' या शोसारखे आहेत.' असा खुलासा केला आहे. तसेच यावेळी सुनिधी अनेक गायक ऑटो ट्यून वापरतात त्यावरही भाष्य केलं आहे. ती म्हणाली, 'अनेक गायक स्टेजवर गाताना देखील साउंडचा वापर करतात.' असा देखील खुलासा केला.