कोण आहेत पियुष रानडेच्या आधीच्या 2 पत्नी?
अभिनेता पियुष रानडेने पहिलं लग्न अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिच्याशी केलं होतं. दोघांचा संसार काही वर्षातच मोडला. त्यानंतर त्याने 'अस्मिता' फेम अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांचाही संसार काही वर्षात मोडला. त्यानंतर पियुषने आता अभिनेत्री सुरूची अडारकरबरोबर तिसरा संसार थाटला. पियुषच्या दोन्ही माजी पत्नी या मराठी इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
advertisement
( Suruchi Adarkar on Marriage : 2 लग्न मोडलेल्या पियुषशी लग्न का केलं? सुरूचीने पहिल्यांदाच मौन सोडलं )
पास्ट इज पास्ट
'पियुषबरोबर लग्न करण्याचा निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतला होता. मी त्याला तो जसा आहे तसं स्वीकारलं होतं. माणूस म्हणून जर तो चुकीचा असता तर कुणीही का असंच त्याच्याबरोबर? जर त्याच्या काही घडलंय तर त्याचे पडसाद त्याला जास्त जाणवलेत. पास्ट इज पास्ट. कोणीही चुकीचं नसतं. कोणत्याही रिलेशनमध्ये कोणाची चूक आहे हे नसतं ते सगळ्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. दोन व्यक्ती खूप चांगल्या आहेत. पण त्यांचं नाही पटतंय मग त्यांनी अट्टाहासाने का एकत्र रहावं. फक्त समाजात तुम्ही एकत्र आहात म्हणून तुम्ही एकत्र राहा असं नाही. जे लोक त्या क्षणी एकत्र होण्याचाही निर्णय घेतात ते लोक खरंच ग्रेट आहेत.'
त्या व्यक्ती समोर आल्या तर...
'रिलेशनशिपमध्ये असतो आणि आपल्या पार्टनरचे याआधी दोन पार्टनर होते तेव्हा मनात इनसिक्युरिटी येते का? उद्या त्यांच्यापैकी कोणीही त्याच्यासमोर आलं. बोललं तर अशी इनसिक्युरिटी वाटते का?' असा प्रश्न विचारल्यास सुरूची म्हणाली, 'मला अजिबात इनसिक्युरिटी नाहीये. आमच्या नात्यात एक गोष्ट खूप चांगली आहे की आम्ही नवरा बायको होण्याआधी खूप चांगले मित्र आहोत. तो याच इंडस्ट्रीत काम करणार आहे आणि बरेच लोक समोर येणार आहेत हे माहिती आहे. काय हरकत नाही. ते नाही पटलं किंवा नाही जमलं म्हणून असं झालं. ज्या वेळी आपण वेगळे झालो तेव्हा वेगळ्या परिस्थितीमध्ये होतो आणि आता आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत. त्याबाबतीत आम्ही खूप सेम आहोत आम्हाला कोणतीही इनसिक्युरिटी नाहीये. आम्ही एकमेकांबद्दल पझेसिव्ह होतो पण ते गंमतीत असतं.'
लग्नानंतर लोकांच्या प्रश्नांना कशी समोरी गेली?
सुरूची म्हणाली, "आजपर्यंत पियुष माणूस म्हणून कोणापर्यंत पोहोचला नाही. कारण तो बोलत नाही. आमच्या नात्यात बऱ्याचदा मी त्याला विचारचे, मी त्याच्याशी बोलायचे, त्याला मी बोलण्याची सवय लावली. कारण आपण बोलल्यानंतर कोणीतरी स्वीकारेल किंवा करणार नाही या भितीने कदाचित बोलत नव्हता. पण मी त्याला बोलतं केलं. त्यानंतर मला कळलं होतं की तो कोणापर्यंत पोहोचलेलाच नाहीये. लोक हल्ली जजमेंटल झाले आहेत त्यामुळे त्याचा तसा काही फरक पडत नाही. कोणीतरी स्ट्राँग राहणं महत्त्वाचं आहे जी मी आहे. मला माझ्या निर्णयावर खात्री असते कारण मी निर्णय घेतल्यानंतर विचार करत नाही तर निर्णय घेण्याआधी विचार करते."
