पत्नीशी आहे खास नातं
चंपकलाल गडाचं पात्र साकारणारे अमित भट्ट खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक आहेत, जे त्यांच्या ऑन-स्क्रीन प्रतिमेपेक्षा अगदी वेगळे आहे. ते अनेकदा आपली पत्नी क्रुती भट्टसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अमित आणि क्रुती यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. विशेष म्हणजे, अनेक लोक क्रुती भट्ट यांच्या सौंदर्याचं कौतुक करत म्हणतात की त्या तर शोमधील बबिता जींनाही मागे टाकतात.
advertisement
तसं पाहिलं तर क्रुती या गृहिणी नाहीत, त्या एक डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत. त्यामुळेच त्या स्वतःला खूप फिट ठेवतात.
शोमध्ये झळकला आहे मुलगाही
क्रुती भट्ट या अनेकदा 'तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर दिसतात आणि शोमधील कलाकारांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. महिला मंडळीसोबतही त्यांची घट्ट मैत्री आहे, त्यामुळे सेटवर त्या अगदी आपल्यातल्याच वाटतात. अमित आणि क्रुती यांना देव आणि दीप ही दोन मुलं आहेत. दोन्ही मुले खूप गोड आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा एक मुलगा मालिकेत टप्पूच्या मित्राच्या भूमिकेतही झळकला आहे. देव भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तो मजेशीर, फनी व्हिडीओ बनवत असतो. या व्हिडीओंमध्ये अनेकदा अमित आणि क्रुतीही दिसतात.
