‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर नट्टू काकांची आठवण हमखास येते. "सेठजी, ओ सेठजी..." म्हणणारा हा निरागस आणि गोड स्वभावाचा कॅरेक्टर लोकांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. हे पात्र साकारणारे अभिनेते होते घनश्याम नायक.
'वहिनी... वहिनी' म्हणून तिलाच बनवली बायको, राम कपूरची Filmy Love story!
घनश्याम नायक यांचं आयुष्य संघर्षमय होतं. ते मूळचे गुजरातमधले. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांचं शिक्षण फार पुढे जाऊ शकलं नाही. दहावीनंतर त्यांनी शाळा सोडली. पण लहान वयापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. फक्त चार वर्षांचे असतानाच त्यांना पहिला ब्रेक मिळाला. 1959 मध्ये आलेल्या “नानी तेरी मोरनी को मोर ले गए” या गाण्यात त्यांनी काम केलं होतं. या गाण्यात त्यांच्यासोबत लहानगी हनी इराणी होती, जी पुढे जाऊन दिग्दर्शक फरहान अख्तरची आई ठरली.
advertisement
शाळेत असतानाच त्यांनी अशोक कुमार आणि नंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतही चित्रपट केले. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. त्या काळात त्यांना दिवसाचे 24 तास काम करून फक्त 3 रुपये मिळायचे. एवढ्या पैशात घर चालणं अशक्य होतं. त्यामुळे अनेकदा ते मित्रांकडून उसने पैसे आणायचे. हळूहळू त्यांना नाटकं, गुजराती फिल्म्स आणि बॉलिवूडमध्ये लहानमोठ्या भूमिका मिळू लागल्या. हम दिल दे चुके सनम, क्रांतीवीर, मासूम अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. मासूममध्ये ते बालकलाकार म्हणून दिसले होते. पण खरी लोकप्रियता मात्र आली ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधल्या नट्टू काका या भूमिकेमुळे. या एका पात्राने त्यांना घराघरात पोहोचवलं.
वय वाढत असतानाच त्यांना कर्करोग झाला. घशात गाठी झाल्याने त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली. थोडा काळ तब्येत सुधारली होती, त्यामुळे चाहते त्यांना पुन्हा स्क्रीनवर पाहण्याची वाट पाहत होते. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 3 ऑक्टोबर 2021 रोजी, वयाच्या 77 व्या वर्षी घनश्याम नायक यांनी जगाचा निरोप घेतला.