इलेक्ट्रिक शॉक अन् वादाची ठिणगी
त्याचं झालं असं की, घरात एक टास्क रंगणार आहे ज्यामध्ये स्पर्धकांना इलेक्ट्रिक शॉक दिले जाणार आहेत. आर्या मुद्दाम निक्कीला डिवचण्यासाठी तिला शॉक देणार असल्याचं म्हणते. यामुळे निक्की प्रचंड अस्वस्थ होते आणि हा टास्क करण्यास नकार देते. मात्र, खेळाची शिस्त आणि स्ट्रॅटेजी जपणाऱ्या शिव ठाकरेला निक्कीचा हा स्वभाव पटत नाही. शिव निक्कीला तिच्या भूमिकेवरून जाब विचारतो आणि तिथूनच वादाला तोंड फुटतं.
advertisement
दिपालीचा एक प्रश्न अन् करणला अश्रू अनावर, Bigg Boss च्या घरात पहिल्यांदाच भावुक झाला Focuse Indian
शिव विरुद्ध अरबाज
जेव्हा शिव आणि निक्कीमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू होतं, तेव्हा निक्कीचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलही या भांडणात उतरतो. आपल्या गर्लफ्रेंडची बाजू सावरण्यासाठी अरबाज शिवला मर्यादा राखण्याची तंबी देतो. "तिच्याशी नीट बोल," असं म्हणणाऱ्या अरबाजला शिवने जुमानलं नाही आणि दोघांमधील वाद विकोपाला गेला.
शोच्या प्रोमोमध्ये दिसलं की, वाद इतका वाढला की शिवने रागाच्या भरात अरबाजला ढकललं. शिवचा हा पवित्रा पाहून अरबाजचाही ताबा सुटला. त्याने शिवला दम भरला की, "शब्दांची लढाई शब्दांनीच खेळ, हात उचलण्याची चूक करू नकोस!"
पॅलेसमध्ये खळबळ, आता पुढे काय?
दोघांमधील धक्काबुक्की पाहून घरातील इतर सदस्यांनी धाव घेतली आणि दोघांना बाजूला केलं. मात्र, या एका घटनेमुळे घराचे समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. जिथे मैत्री आणि युतीचे खेळ चालतात, तिथे शिव आणि अरबाज यांच्यातील हा संघर्ष घराचे दोन तुकडे करणार असं दिसतंय. शिव ठाकरेचा शांत स्वभाव आणि अरबाजचा आक्रमकपणा यामुळे 'The 50' चा खेळ अधिकच मसालेदार होतोय, हे नक्की.
