TRENDING:

पारंपरिक ते ट्रेंडी वस्तू, ठाण्यात स्वस्तात करा खरेदी, इथं भरलंय खास प्रदर्शन

Last Updated:

ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून फॅशन, लाइफस्टाइल, हँडक्राफ्टेड आणि पारंपरिक ते ट्रेंडी वस्तूंचा उत्कृष्ट संगम येथे पाहायला मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे येथील टी.एम.सी. ग्राउंडला युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो अंतर्गत श्री सखी एक्झिबिशनचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. दररोज दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून फॅशन, लाइफस्टाइल, हँडक्राफ्टेड आणि पारंपरिक ते ट्रेंडी वस्तूंचा उत्कृष्ट संगम येथे पाहायला मिळणार आहे.
advertisement

या प्रदर्शनात भेटवस्तू, कपडे, दागिने, गृहसजावटीच्या वस्तूंसह विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खास आकर्षण ठरत आहेत साड्यांचे स्टॉल, जिथे पैठणी, कॉटन, लिनन, साउथ सिल्क अशा विविध प्रकारच्या साड्या अगदी 650 रुपयांपासून 2000 पर्यंत उपलब्ध आहेत. प्रदर्शनात कॉटन, लिनन, खादी, बटिक यांसारखे ड्रेस मटेरियल 650 ते 1500 पर्यंत मिळत आहेत. 1 ग्रॅमची ज्वेलरीही खास आकर्षण ठरत असून त्यामध्ये नेकलेस, इअररिंग्स, ब्रेसलेट, रिंग्स आदींचा समावेश आहे. या दागिन्यांची किंमत 500 पासून सुरू होते.

advertisement

Success Story : व्यवसायाला दिली शिक्षणाची जोड, तुषारने उभारला बेकरी ब्रँड, महिन्याला 5 लाखांची उलाढाल

कोकणातील हस्तकलेच्या वस्तूंना तसेच होम डेकोरच्या वस्तूंना येथे विशेष स्थान आहे. हँडमेड वस्तूही 300 पासून ते 3000 पर्यंत उपलब्ध आहेत. प्रदर्शनात कॉटन टॉप्स फक्त 500 रुपयांचे 2 अशा विशेष ऑफरमध्ये उपलब्ध आहेत. खाद्यप्रेमींसाठी प्रीमियम क्वालिटीचे काजू, बदाम, पिस्ता यासह इतर अनेक दर्जेदार ड्राय फ्रूट्सही येथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक ते ट्रेंडी वस्तू, ठाण्यात स्वस्तात करा खरेदी, इथं भरलंय खास प्रदर्शन
सर्व पहा

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. एकाच ठिकाणी विविध संस्कृतींचा आणि कलेचा संगम अनुभवायला मिळत आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पारंपरिक ते ट्रेंडी वस्तू, ठाण्यात स्वस्तात करा खरेदी, इथं भरलंय खास प्रदर्शन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल