‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 1946 मधील कलकत्त्याच्या दंगलींची पार्श्वभूमी दाखवली आहे. यात त्या काळातील प्रसिद्ध बंगाली लढवय्या गोपाल मुखर्जी यांना "कसाई गोपाल पाठा" असा उल्लेख करण्यात आला. हाच मुद्दा उचलून आता गोपाल मुखर्जी यांचे नातू शंतनू मुखर्जी संतप्त झाले आहेत.
कोण तू? काय पाहिजे? जया बच्चनच्या वागणुकीवर मुकेश खन्ना संतापले
advertisement
शंतनू मुखर्जींचा दावा आहे की, "माझे आजोबा कसाई नव्हते. ते व्यावसायिक कुस्तीगीर होते आणि अनुशीलन समितीचे प्रमुख होते. त्यांनी 1946 च्या दंगली थांबवण्यात मोठी भूमिका बजावली होती." त्यांचा आरोप आहे की चित्रपटात त्यांच्या आजोबांना चुकीच्या पद्धतीने दाखवून त्यांची प्रतिमा कलंकित केली जात आहे.
या विरोधानंतर शंतनू मुखर्जी यांनी विवेक अग्निहोत्रींना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
शंतनू मुखर्जी म्हणाले,"माझ्या आजोबांना कसाई आणि बकरी म्हटले गेले, जे अत्यंत अपमानजनक आहे. विवेक अग्निहोत्रींनी योग्य माहिती घेण्याऐवजी चुकीचं चित्रण केलं. त्यांनी आमच्याशी संपर्क साधलाही नाही. त्यामुळे आम्ही हा निषेध थांबवणार नाही."
दरम्यान, ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील कहाणीवर आधारित असल्याने आधीच तो चर्चेत होता. आता या वादामुळे चित्रपटाची टीम अडचणीत आली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्यावर आधीच ‘द काश्मीर फाइल्स’मुळे अनेक आरोप झाले होते. आता ‘द बंगाल फाइल्स’ भोवतीचा हा गदारोळ त्यांना नव्याने संकटात आणतो आहे.
