Mukesh Khanna on Jaya Bachchan: कोण तू? काय पाहिजे? जया बच्चनच्या वागणुकीवर मुकेश खन्ना संतापले
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Mukesh Khanna on Jaya Bachchan:बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभेतील खासदार जया बच्चन त्यांच्या रागिट स्वभावासाठी ओळखल्या जातात. कधीही स्पॉट झाल्यावर त्यांचा मूड नेहमी रागीट असतो.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभेतील खासदार जया बच्चन त्यांच्या रागिट स्वभावासाठी ओळखल्या जातात. कधीही स्पॉट झाल्यावर त्यांचा मूड नेहमी रागीट असतो. नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्यांनी चाहत्याला रागात बाजूला ढकललं. या व्हिडीओमुळे त्या खूप ट्रोल झाल्या. अशातच आता जया बच्चन यांच्या कृतीवर अभिनेते मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे.
दूरदर्शनवरील शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी जया बच्चन यांच्या या वागण्यावर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले “पत्रकार आणि चाहत्यांशी तिचे वागणे चुकीचे आहे. ती सतत रागीट दिसते. संसदेतसुद्धा ती अनेकदा मोदीजींच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्दे शोधते.”
फिल्मी ज्ञानसोबत बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, आजकाल त्यांचं पत्रकारांसोबत, पापाराझींसोबत जे वागणं आहे, कोण आहेस तू? काय पाहिजे? हे फार चुकीचं आहे. मुकेश खन्नाच्या मतावर अनेकांनी सहमती दर्शवली.
advertisement
अभिनेत्री कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जया यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांना ‘बिघडलेली आणि विशेषाधिकारप्राप्त महिला’ म्हटले. तिने एवढेच नव्हे तर, “लोक तिचा राग सहन करतात कारण ती अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे” अशी टिप्पणी केली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही ट्विटरवरून जया बच्चन यांचा निषेध केला. त्यांनी लिहिले “ज्यांना जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी असा अपमानकारक वर्तन करणे शोभादायक नाही. तिच्या दर्जाच्या कलाकाराकडून विनम्रता आणि आदर अपेक्षित आहे.”
advertisement
दरम्यान, याआधीही जया बच्चन पापाराझींवर ओरडताना आणि चिडताना अनेक वेळा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी साध्या चाहत्याला ढकलल्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर ठरला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 17, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mukesh Khanna on Jaya Bachchan: कोण तू? काय पाहिजे? जया बच्चनच्या वागणुकीवर मुकेश खन्ना संतापले










