Mugdha Godbole : 'त्या कुटुंबाने माझ्याभोवती गर्दी करुन...' जया बच्चन प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट

Last Updated:

Mugdha Godbole : जया बच्चन यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर गदारोळ झाला आहे. अनेकजण त्यांच्या कृतीमुळे ट्रोल करत आहेत. मात्र अशातच मराठी अभिनेत्रीने जया बच्चनची बाजू घेतली आहे.

 जया बच्चन प्रकरणावर अभिनेत्रीची पोस्ट
जया बच्चन प्रकरणावर अभिनेत्रीची पोस्ट
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांनी सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला बाजूला ढकललं होतं. त्यांच्या या कृतीवर अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यांना खूप ट्रोलही करण्यात आलं. अशातच आता मराठी अभिनेत्रीने जया बच्चनची बाजू घेतली आहे.
मराठी अभिनेत्री व लेखिका मुग्धा गोडबोले यांनी जया बच्चन यांच्या घटनेनंतर स्वतःचे अनुभव सांगत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. जो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? याविषयी जाणून घेऊया.
पहिला प्रसंग सांगताना मुग्धा यांनी लिहिलं, काही वर्षांपूर्वी मी माझ्या आईवडिलांना घेऊन जेवायला गेले होते. बाबांचा वाढदिवस होता. मी खास तेवढ्यासाठी मुंबईहून तळेगावला गेले होते, ते मला भेटायला म्हणून त्या दिवशी तिथे आले होते. काही तास आम्ही एकत्र असणार होतो कारण तेवढाच वेळ आम्हाला मिळणार होता.
advertisement
आमच्या मागच्या टेबलवर एक लेकुरवाळं कुटुंब होतं. किती लेकुरवाळं, तर आठ दहा मुलं आणि सगळी मिळून पंचवीस जणं. मी जेवताना सतत ती मुलं माझ्या बाजूला येऊन बसत होती, त्यांचे दादा काकू वडील येऊन हसत हसत फोटो काढत होते. नंतर ते सगळे निघताना त्यांची अशी अपेक्षा होती की मी जेवण सोडून उठून त्यांच्याबरोबर एक फोटो काढावा. मी त्याला नकार दिल्यावर त्यांनी माझ्या भोवती कोंडाळं करून सेल्फी काढला. परवानगी वगैरेचा संबंधच नाही.
advertisement
दुसरी घटना सांगत त्यांनी लिहिलं, माझ्या नाटकाचा प्रयोग संपला. आणि माझ्या शाळेतल्या माझ्या माने बाई अचानक मला भेटायला आल्या. हातात काठी. कश्याबशा उभ्या होत्या. अर्थात मला खूप आनंद झाला, मी त्यांना नमस्कार केला, त्यांच्याशी बोलू लागले. त्यांना उभं राहतानाही आधार लागत होता पण त्या खास मला भेटायला नाटक संपल्यावर थांबल्या होत्या. माझ्या लक्षात आलं की तीन पुरुष बाजूला थांबले होते. त्यातल्या एकाने अत्यंत उर्मट आवाजात, 'ओ द्या की फोटो आम्ही थांबलोय', असं म्हटलं. मी शांतपणे म्हटलं ' दोन मिनिटं थांबा, आले.' यावर त्याहून उर्मटपणे 'आम्ही प्रेक्षक आहे आम्हाला थांबायला नका सांगू, ' असं तो म्हणाला. लाज वाटून माझ्या बाई म्हणाल्या ' काढ त्यांच्याबरोबर फोटो मी निघते आहे. '. बाई गेल्या, मला त्यांना नीट भेटता आलं नाही, त्यांचा नंबर घेता आला नाही याची खंत माझ्या मनात कित्येक वर्ष राहिली आहे. मला काहीच म्हणायचं नाहीये. असंख्य पैकी या दोन घटना.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mugdha Godbole : 'त्या कुटुंबाने माझ्याभोवती गर्दी करुन...' जया बच्चन प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement