Viral Video: 'अरे हे काय करताय?' जया बच्चन पुन्हा भडकल्या, रागात व्यक्तीला दिलं ढकलून; नेमकं काय घडलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Jaya Bahchan viral video: बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन सतत त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात. मीडियासमोर नेहमीच त्या भांडणाच्या मूडमध्ये किंवा रागावलेल्या पाहायला मिळतात.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन सतत त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात. मीडियासमोर नेहमीच त्या भांडणाच्या मूडमध्ये किंवा रागावलेल्या पाहायला मिळतात. आता त्या पुन्हा याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. जया बच्चनचा नवा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये त्यांनी चक्क एका व्यक्तीला रागात बाजूला ढकललं.
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी आयोजित कार्यक्रमाला जया बच्चन उपस्थित होत्या. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जया बच्चन यांना हे अजिबात पसंत पडले नाही. त्यांनी त्या व्यक्तीला हाताने ढकलले आणि "क्या कर रहे हैं आप?" असे रागाने म्हटले.
advertisement
ही घटना तेथील उपस्थितांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना जया बच्चन यांच्या वारंवार दिसणाऱ्या चिडचिडेपणावर टीका केली, तर काहींनी त्यांचे समर्थन करत म्हटले की, सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक जागेचा (personal space) आदर करणे आवश्यक आहे.
सेल्फी ले रहे युवक पर भड़कीं जया बच्चन
"क्या कर रहे हैं आप?": Why Jaya Bachchan got angry at Constitution Club#JayaBachchan #ConstitutionClub #NewDelhi #Viral #ViralVideo pic.twitter.com/kOwRvK0kJe
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) August 12, 2025
advertisement
जया बच्चन या याआधीही पत्रकारांवर आणि चाहत्यांवर राग काढल्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच संसदेतही त्यांनी माध्यमांविरोधात कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 12, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Viral Video: 'अरे हे काय करताय?' जया बच्चन पुन्हा भडकल्या, रागात व्यक्तीला दिलं ढकलून; नेमकं काय घडलं?











