धुळ्यात कमळ फुललं, निवडणुकीआधी तीन नगरसेविका विजयी; जल्लोषाला सुरुवात
- Reported by:Deepak Borase
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धुळे महानगरपालिकेत आतापर्यंत भाजपच्या एकूण तीन महिला नगरसेविका बिनविरोध निवडून आल्या आहेत.
धुळे: धुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची बिनविरोध विजयाची घोडदौड कायम असून, शहरातील राजकीय समीकरणांमध्ये भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 ब मधून भाजपच्या उमेदवार सुरेखा चंद्रकांत उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही बिनविरोध निवड निश्चित झाली.
धुळे महापालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. सुरेखा उगले यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपच्या खात्यात आणखी एका महिला नगरसेविकेची भर पडली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही भाजपच्या दोन महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे आतापर्यंत भाजपच्या एकूण तीन महिला नगरसेविका बिनविरोध निवडून आल्या आहेत. तीन महिला नगरसेविका निवडून आल्या
धुळ्यात भाजपचं मोठे यश
advertisement
दरम्यान धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठांना आपण विजयाचे श्रेय देत असल्याचं यावेळी विजयी उमेदवार सुरेखा उगले यांनी सांगितलं. माघारीच्या पहिल्याच दिवशी बिनविरोध निवड होणे हे भाजपसाठी मोठे यश मानले जात आहे.
धुळे महापालिकेवर कमळं फुललं
धुळे महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींची संख्या वाढत असल्याने निवडणूक लढतींची रंगत काही प्रमाणात कमी होत असली, तरी भाजपची ताकद आणि प्रभाव मात्र अधोरेखित होत आहे. महिला प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनेही भाजप आघाडीवर असून, महिला उमेदवारांना मिळत असलेला पाठिंबा हा पक्षासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे. आगामी काळात आणखी काही प्रभागांमध्ये बिनविरोध निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात असून, धुळे महापालिकेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होण्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसत आहेत.
advertisement
राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकीआधी कमळ फुलले
कल्याण डोंबिवली, पिंपरी, पनवेलनंतर आता भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पहिला विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे कल्याण- डोंबिवलीत भाजपने धुराळा उडवला असून केडीएमसीची निवडणूक होण्यापूर्वी भाजप आपले नगरसेवक निवडणूक आणत आहे. आतापर्यंत चार भाजपचे बिनविरोध निवडून आले असून मंदा सुभाष पाटील पॅनल क्र 27, अ मधून बिनविरोध आल्या आहेत.
advertisement
भाजपने उमेदवारी दिली पण ट्रोलर्समुळे अर्ज मागे घ्यावा लागला, पूजा मोरे नवऱ्याच्या गळ्यात पडून रडल्या
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 3:40 PM IST











