Infinix Note Edge 5G फोन झाला लॉन्च! मिळेल कर्व्ड डिस्पेल, साउंड क्वालिटीही भारी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Infinix Note Edge 5G लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 3D कर्व्ड 1.5K AMOLED डिस्प्ले, 6500mAh बॅटरी आणि IP65 रेटिंगच्या खासियतसह उतरवण्यात आला आहे.चला जाणून घेऊया हा फोन कोणत्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची विक्री कधीपासून सुरु होईल आणि हा फोन कोणकोणत्या खासियतसह लॉन्च झालाय.
Infinix ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी नवा मिड रेंज स्मार्टफोन Infinix Note Edge 5G लॉन्च केलाय. याच्या खासियतविषयी बोलायचं झाल्यास हा हँडसेट 3D कर्व्ड 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 6500mAh च्या मोठ्या बॅटरीसह येतो. डिव्हाइलला डस्ट आणि स्पलॅश रेजिस्टेंससाठी IP65 रेटिंग मिळाली आहे. सोबतच वेट टच फंक्शनॅलिटीच्या सपोर्टसह येतो. JBL साउंडसह येणाऱ्या या फोनला 3 वर्षे OS अपडेट आणि 5 वर्षे सिक्योरिटी पॅच मिळतील.
advertisement
Infinix Note Edge 5G Price in India : या 5G Smartphone चे तीन व्हेरिएंट्स उतरवण्यात आले आहेत.6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आणि 8GB/256GB च्या टॉप व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, फोनची विक्री आज (18 फेब्रुवारी) पासून कंपनीच्या साइट, फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.
advertisement
advertisement
या स्मार्टफोनची स्पर्धा OnePlus Nord CE5 5G, Realme 14 Pro+ 5G, Vivo T4 5G आणि OPPO K13 5G सारख्या स्मार्टफोन्ससोबत होते. स्क्रीनविषयी बोलायचं झाल्यास फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED 3D कर्व्ड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 4500 निट्स आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i वापरला जातो.
advertisement
advertisement
कॅमेरा सेटअप : फोनच्या मागच्या भागात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकेंडरी कॅमेरा सेन्सर मिळतो. फोनमध्ये लाइव्ह फोटोज आणि AI इरेजर सारखे एआय टूल्ससारख्या फीचर्सचाही सपोर्ट आहे. यामध्ये अॅक्टिव्ह हेलो लायटिंगसह एक सिग्नेचर कॅमेरा मॉड्यूलही आहे. जे नोटिफिकेशन, कॉल आणि म्यूझिकसाठी कस्टमाइज केलं जाऊ शकतं. सेल्फीसाठी 13MP चा कॅमेरा सेन्सर आहे.
advertisement









