पिंपरीत भाजपने पहिला गुलाल उधळला, महेश लांडगेंच्या भोसरीतून थाटात गडी आला निवडून
- Reported by:Govind Wakde
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पिंपरी चिंचवडच्या भोसरी मतदारसंघातून भाजपमध्ये विजयाचं खातं देखील उघडलं आहे.
पुणे : भाजपने नगरपालिकेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत विजयी सलामी दिली असून भाजपचे राज्यभरातून उमेदवार विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेतून भाजपच्या विजयाचा श्रीगणेशा झाला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भोसरी प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रवी लांडगे यांनी पुन्हा एकदा बाजी मारत सलग दुसऱ्यांदास बिनविरोध निवडून येण्याचा मान पटकावला आहे. तसेच त्यांनी भाजपमध्ये विजयाचं खातं देखील उघडलं आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आणि काहीं उमेदवारांनी माघार घेतल्याने लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
रवी लांडगे यांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरवण्यात आला. तर मनसेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांचा अर्ज दाखल न झाल्याने लांडगे यांचा मार्ग मोकळा झाला. सलग दोनवेळा बिनविरोध निवडून येणारे रवी लांडगे हे शहरातील पहिले लोकप्रतिनिधी ठरले असल्याने चर्चेचा विषय बनले आहेत .
advertisement
पिंपरीत भाजप किती जागांवर लढणार?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शेवटच्या क्षणापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत कमालीची गुप्तता पाळली असून, अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळले. आज भाजपने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पिंपरीमध्ये महायुती फिस्कचली असून त एकूण 128 जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजप + RPI आठवले गट एकत्र निवडणूक लढवणार असून भाजप 123 तर RPI आठवले गट 5 जागा लढणार आहे. आता निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकर भाजपला नेमका कौल कसा देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची थेट लढत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी होणार आहे.
advertisement
राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकीआधी कमळ फुलले
कल्याण डोंबिवली, धुळे, पनवेलनंतर आता भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पहिला विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे कल्याण- डोंबिवलीत भाजपने धुराळा उडवला असून केडीएमसीची निवडणूक होण्यापूर्वी भाजप आपले नगरसेवक निवडणूक आणत आहे. आतापर्यंत चार भाजपचे बिनविरोध निवडून आले असून मंदा सुभाष पाटील पॅनल क्र 27, अ मधून बिनविरोध आल्या आहेत..
advertisement
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 3:16 PM IST











