advertisement

'पोद्दार' इंटरनॅशनल ग्रुपच्या २५ शाळांना पायघड्या, अल्पसंख्याक खात्यातला 'आका' कोण?

Last Updated:

एकाच दिवसात बहुचर्चित 'पोद्दार' इंटरनॅशनल ग्रुपच्या २५ शाळांना अल्पसंख्याक विभागातून वादग्रस्त प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

अजित पवार
अजित पवार
राहुल झोरी, प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा असतानाही काही तासांतच अल्पसंख्याक विभागात रखडलेल्या नस्ती (फाईल), विशेष म्हणजे अडचणीच्या फाईलींवर स्वाक्षरी करणाऱ्या धडाका उठला. याप्रकरणासंबंधी संशयाची सुई असणारे सनदी अधिकारी मिलिंद शेनॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात आता नवनवी माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासकीय दुखवटा काळात अल्पसंख्याक विभागाने ७५ शाळा तथा संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. यामध्ये 'पोद्दार' इंटरनॅशनल ग्रुपच्या २५ शाळांना अल्पसंख्याक विभागाने पायघड्या घातल्या. या पोद्दार ग्रुपवर एवढी मेहेरबानी का? ग्रुपवर कुणाची माया आहे? असे प्रश्न उपस्थित आहेत.
एकाच दिवसात बहुचर्चित 'पोद्दार' इंटरनॅशनल ग्रुपच्या २५ शाळांना अल्पसंख्याक विभागातून वादग्रस्त प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. बहुचर्चित ' पोद्दार ' इंटरनॅशनल स्कुलसाठी अल्पसंख्याक खात्याने नियमबाह्य पद्धतीने प्रमाणपत्र वाटप केल्याची चर्चा आहे.
advertisement
विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मंत्रालयात कामकाज ठप्प असतानाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या दुःखद निधनाची माहिती देत शासकीय दुखवटा जाहीर केलेला असतानाही अजित पवारांच्या अखत्यारीत येणाऱ्या अल्पसंख्याक विभागाने दुखवटा सोडून वादग्रस्त कारभार सुरू ठेवला.
या दरम्यान ३ महिन्यांपासून स्थगिती असणाऱ्या निर्णयाच्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याच काम सुरू होते. शासकीय दुखवटा असताना शासकीय कामकाजाची वेळ संपली असतानाही लॅागिन करून अल्पसंख्यांक शाळांना विशेष मंजुरी दिल्या. मंत्रालयाच्या एका माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावर परवानगीसाठी एखादी फाईल पोहोचायला एरव्ही महिनमहिने लागतात. मात्र स्थगिती असणाऱ्या निर्णयांची फाईल ६ व्या माळ्यावर पोहोचून काही तासांतच परवानगी मिळवली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पोद्दार' इंटरनॅशनल ग्रुपच्या २५ शाळांना पायघड्या, अल्पसंख्याक खात्यातला 'आका' कोण?
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement