TRENDING:

'आज तोच दिवस आहे...' रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा अंगावर शहारे आणणारा फर्स्ट लूक आऊट; 'या' शुभदिनी होणार रिलीज

Last Updated:

Raja Shivaji Movie: अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती, त्या ऐतिहासिक चित्रपट 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चा पहिला अधिकृत पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज अवघा महाराष्ट्र शिवजयंतीच्या उत्सवात न्हाऊन निघाला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमत असतानाच, अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने शिवभक्तांना एक अभूतपूर्व भेट दिली आहे. अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती, त्या ऐतिहासिक चित्रपट 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चा पहिला अधिकृत पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. रितेशने केवळ पोस्टरच नाही, तर या चित्रपटाची भव्य स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करून सिनेसृष्टीत धमाका उडवून दिला आहे.
News18
News18
advertisement

पोस्टरमध्ये दिसला शिवरायांचा कणखर अवतार

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात रणांगणावर उभा असलेला दिसत आहे. अंगावर चिलखत, हातात तलवार आणि फडकरणारा भगवा ध्वज... हा लूक पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. "आज तोच दिवस आहे, जेव्हा अंधाराला पहिल्यांदा प्रकाशाचं स्वप्न पडलं... जेव्हा इतिहासानं नव्या भविष्याकडे पाऊल उचललं... जेव्हा आपल्या मातीला मिळाला नवा स्वाभिमान..." अशा शब्दांत या चित्रपटाचं सार मांडण्यात आलं आहे.

advertisement

40 वर्ष इंडस्ट्री गाजवली, 2 लग्न करून आला चर्चेत; बॉलिवूडचा भयानक व्हिलन पुण्याच्या रस्त्यांवर तळतोय वडे, VIDEO VIRAL

अभिषेक, संजय दत्त अन्... तगडी फौज मैदानात

'राजा शिवाजी'चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची स्टारकास्ट. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील दिग्गजांची फौज एकत्र आणली आहे. या चित्रपटात रितेशसोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, फर्दीन खान आणि भाग्यश्री असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी अजय-अतुल या जोडीने सांभाळली असून, चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी केली आहे.

advertisement

प्रदर्शनाची तारीख ठरली

रितेशने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय की, हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच 'महाराष्ट्र दिना'च्या मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २०२२ मध्ये 'वेड' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या रितेशने बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम प्रस्थापित केले होते. आता स्वतःच्या दिग्दर्शनाखाली तो छत्रपतींचा इतिहास मोठ्या पडद्यावर कसा मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, काय घडलं?
सर्व पहा

रितेश सध्या यशाच्या शिखरावर आहे. २०२५ मध्ये त्याचे 'हाऊसफुल ५' आणि 'मस्ती ४' सारखे मोठे चित्रपट आले. सध्या तो 'बिग बॉस मराठी ६' चे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लवकरच त्याचा 'धमाल ४' देखील येणार आहे. मात्र, 'राजा शिवाजी' हा त्याच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'आज तोच दिवस आहे...' रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा अंगावर शहारे आणणारा फर्स्ट लूक आऊट; 'या' शुभदिनी होणार रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल