लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गश्मीरने त्याच्या हिंदी मनोरंजन विश्वातील प्रवासातील अनुभव शेअर केले. गश्मीर म्हणतो, “हिंदी सिनेमांसाठी ऑफर्स येत होत्या, पण एक-दोन वेळा अनुभव वाईट आला. जसा सिनेमा भासवला जातो तसा प्रत्यक्षात बनत नाही, किंवा ऐकवलेली भूमिका शेवटी तशी उरत नाही, हे मी अनुभवले.”
'त्यांनी मला फसवलं...' गश्मीर महाजनीचं हिंदी सिनेसृष्टीबाबत खळबळजनक वक्तव्य
advertisement
त्यामुळे आता तो कोणताही प्रोजेक्ट स्वीकारण्याआधी खूप काळजीपूर्वक निर्णय घेतो. तो म्हणतो, “आता मी पटकथेला खूप महत्त्व देतो. त्याहून अधिक, माणूस कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे, त्याच्याशी माझं ट्युनिंग जुळतंय का, हे बघतो. कारण सिनेमा फक्त स्क्रिप्टवर नाही, तर त्या मागच्या माणसावरही उभा असतो.”
गश्मीरच्या मते, अभिनय हे केवळ व्यावसायिक क्षेत्र नाही, तर ते एक अनुभूती देणारं क्षेत्र आहे. “प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मजा आली पाहिजे. अनुभवातून शिकत गेलो. काही चुकीच्या भूमिका स्वीकारल्या, त्यातून शिकून पुढचं पाऊल घेतलं.”
गश्मीरचं हे स्पष्ट बोलणं त्याच्या प्रामाणिकपणाची आणि त्याच्या कामाबद्दल असलेल्या निष्ठेची साक्ष देतं. तो म्हणतो, “मी मुद्दाम कमी काम करत नाही. पण आता काम स्वीकारताना माझे निकष ठरलेत. स्क्रिप्ट चांगली, माणसं विश्वासार्ह आणि एकूण प्रकल्पाचं मूल्य असेल तरच मी होकार देतो.”