TRENDING:

TMKOC : 'जेठालाल'च्या नावानं बनवले अश्लील व्हिडिओ; निर्मात्यांची कोर्टात धाव; समोर आला मोठा निर्णय

Last Updated:

लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनीही असंच पाऊल उचललं आहे. ज्यावर न्यायालयाचा निर्णयही आला आहे. काय हे प्रकरण जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जॅकी श्रॉफ, अनिल कपूरपासून अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांनी त्यांच्या आवाजाचा, फोटोंचा आणि प्रसिद्ध संवादांचा गैरवापर केल्याबद्दल कोर्टात धाव घेतली आहे. काही कंपन्या त्यांच्या नावाचा सर्रास गैरवापर करत असल्याचा आरोप करत या स्टार्सनी करत कोर्टात धाव घेतली. आता लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनीही असंच पाऊल उचललं आहे. ज्यावर न्यायालयाचा निर्णयही आला आहे. काय हे प्रकरण जाणून घ्या.
 दिलीप जोशी
दिलीप जोशी
advertisement

'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोच्या निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली होती. या शोने 16 वर्षे टीव्हीवर राज्य केलं. या मालिकेनं आत्तापर्यंत 4000 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. पण अनेक वेळा लोक शोचे नाव, फोटो आणि पात्रांचा वापर करतात. मोठमोठ्या वेबसाइट्सही आर्थिक फायद्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. या मालिकेच्या नावावर यूट्यूबवर अश्लील व्हिडिओ देखील बनवले जात आहेत. त्यावर आलेल्या व्ह्यूजवर ते पैसे कमावत आहेत.

advertisement

भारतातील सर्वात खतरनाक हॉरर थ्रिलर वेब सिरीज; ट्विस्ट पाहून सरकेल पायाखालची जमीन

या आरोपांबाबत 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते कोर्टात पोचले होते. जिथे त्यांनी शोचं नाव आणि पात्र वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावर न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिला.

फिर्यादी नीला फिल्म प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी न्यायालयाला धाव घेतली. त्यांनी देशातील शो आणि पात्रांशी संबंधित नोंदणीकृत ट्रेडमार्कवर त्यांचा वैधानिक अधिकार असल्याचा दावा केला आहे. म्हणजेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा', तारक मेहता, जेठालाल, गोकुलधाम इ. परंतु काही वेबसाइट्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अनधिकृतपणे कॅरेक्टर फोटो, संवाद असलेले टी-शर्ट, पोस्टर्स आणि स्टिकर्स बनवून विकत आहेत.

advertisement

एवढंच नाही तर निर्मात्यांनी शोशी संबंधित डीपफेक आणि बनावट व्हिडिओ गेम देखील बिनदिक्कतपणे बनवले जात असल्याचा दावा देखील केला आहे. हा सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 14  ऑगस्ट रोजी याप्रकरणी आदेश दिला आहे. त्यांनी आपल्या आदेशात म्हटले की, जर या शोशी संबंधित अश्लील मजकूर यूट्यूबवर अपलोड होत असेल तर तो थांबवावा लागेल. तसंच आधी अपलोड केलेले व्हिडीओ आणि कन्टेन्ट काढावा लागणार आहे. 48 तासांच्या आत व्हिडिओ हटवले नाहीत तर आयटी मंत्रालयाला सर्व व्हिडिओंवर बंदी घालण्यास सांगितलं जाईल. तसेच, इतर वेबसाइट परवानगीशिवाय कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क वापरू शकत नाहीत. असा आदेश न्यायालयानं दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
TMKOC : 'जेठालाल'च्या नावानं बनवले अश्लील व्हिडिओ; निर्मात्यांची कोर्टात धाव; समोर आला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल