उर्वशी रौतेलाने स्वतःच हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ती एका रेड कार्पेटवर चालताना दिसत आहे. बाजूला उभे असलेले चाहते तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आतुर आहेत. पण, उर्वशी अचानक एकामागून एक चाहत्यांचे फोन हिसकावून घेते आणि पुढे जाते. एका क्षणासाठी तर चाहत्यांना वाटलं की, त्यांचे फोन चोरीला गेले आहेत.
advertisement
पहिल्या चाहत्याला तर काहीच कळलं नाही, पण दुसऱ्याचा फोनही तिने पटकन घेतला. तिसऱ्याने मात्र तिचा फोन घट्ट पकडून ठेवला होता, त्यामुळे तो वाचला. पण, चौथ्या व्यक्तीचा फोनही तिने लगेच हिसकावून घेतला. हे पाहून सगळेच हसू लागले. कारण, हा सगळा एक प्रँक होता. तिच्यासोबत असलेल्या मॅनेजरने लगेच सगळ्यांचे फोन परत केले.
“यूनिवर्सची पहिली अॅक्ट्रेस, जी मोबाईल चोरतेय!”
उर्वशीने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “चाहते म्हणाले - सेल्फी प्लीज! मी म्हटलं - ठीक आहे, तुमचे सगळे फोन मला द्या.” हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने म्हटलं, “ही कशी वागतेय?” तर दुसऱ्याने मजेत लिहिलं, “युनिव्हर्सची पहिली अभिनेत्री, जी मोबाईल चोरतेय.” काहींनी म्हटलं की, ती 'बिग बॉस १९' मधील तान्या मित्तलची नक्कल करत आहे, कारण तान्यानेही असंच काहीसं केलं होतं. अभिषेक बच्चनही आधी असं करायचा, त्याची ती प्रेरणा असावी, असंही काही जणांनी म्हटलं आहे.