पुणे - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सकाळ पासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रेटी, नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यातच आता ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
advertisement
राज्यभर सगळीकडे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह पाहिला मिळत आहे आणि सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सकाळ पासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. मतदानासाठी रांगेत थांबत सामान्य नागरिकांपासून ते कलाकार मतदान करताना पाहायला मिळत आहे. यामध्ये जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी देखील मतदानाला येत मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकशाही पाहिजे तर लोकांना खऱ्या अर्थाने शिक्षण दिले पाहिजे. लोकांना जगण्याची कमीत कमी हमी दिली पाहिजे. तर लोकांना विचार करायला परवडेल. परंतु विचार करण्यासारखी परिस्थिती नाही. खरंच म्हतारे लोक एवढे कष्ट घेऊन मतदान करतात त्याचा काही उपयोग होणार आहे का, पण ते लोक प्रामाणिकपणे करत आहेत, या शब्दात त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
तसेच आजूबाजूला जे राजकारण सुरू आहे त्याचा लोकशाहीशी काहीही संबंध नाही, या शब्दात यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, येत्या 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येतील. यासाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत. जनता कुणाला संधी देते, हे 23 तारखेला स्पष्ट होईल.