पिस्तूलसह बनवते रिल्स, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, लॉरेन्स बिश्नोईनंतर आता होतेय या 'लेडी डॉन'ची चर्चा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
lady don - गँगस्टर लॉरेंस बिश्नोई या नावाची आज संपूर्ण भारतात चर्चा आहे. नुकतेच गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली. मात्र, यासोबतच लॉरेंस बिश्नोईसोबत आणखी एका लेडी डॉनची चर्चा होत आहे.
अंकित राजपूत, प्रतिनिधी
जयपुर - गँगस्टर लॉरेंस बिश्नोई या नावाची आज संपूर्ण भारतात चर्चा आहे. नुकतेच गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली. मात्र, यासोबतच लॉरेंस बिश्नोईसोबत आणखी एका लेडी डॉनची चर्चा होत आहे.
शिवानी सैनी असे या लेडी डॉनचे नाव आहे. तिने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकून रील तयार केली आणि शस्त्रांसह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर शिवानी सैनीला हिला पोलिसांनी अटक केली.
advertisement
शिवानी सैनी ही राजस्थानच्या अजमेरच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील रहिवासी आहे. तिने गँगस्टर लॉरेंस बिश्नोईसोबत फोटो लावून रील तयार केला आणि स्वत:ला लेडी डॉन म्हटले. रील पोस्ट केल्यानंतर पोलिसांच्या सोशल मीडिया सेल टीमने माहिती दिली आणि पोलिसांनी शिवानी सैनीला शांतता भंग केल्याप्रकरणी अटक केली.
कोण आहे शिवानी सैनी -
शिवानी सैनी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. शिवानीचे वडील चंद्रप्रकाश हे किराणा दुकान चालवतात. तसेच तिची आई गृहिणी असून तिला चार भाऊ-बहीण आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शिवानी आपल्या अकाउंटवर सातत्याने गँगस्टर अंदाजात रील्स आणि फोटो पोस्ट करते. 10 महिन्यांपूर्वीही तिला एक पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तिने पिस्तूलसह चौपाटीवर रील बनवून पोस्ट केला होता. कॅप्शनमध्ये तिने गँगस्टरही लिहिले होते. यावेळीही तिला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने तिला इशारा देत जामीन देत सोडले.
advertisement
पिस्तूलसह बनवली रिल्स -
view commentsशिवानी सैनी सोशल मीडिया अकाउंटवर रिल्समध्ये बंदुकांचा वापर करते. या बंदुका नकली आहेत. मात्र, फक्त फेमस होण्यासाठी ती या पिस्तूल वापरते. या पिस्तूल त्या अॅमेझॉनवर ऑर्डर करते. ही पिस्तूल असली पिस्तूलसारखी दिसते. यामध्ये ती स्वत:ला गँगस्टर असल्याचे दर्शवते. सध्या तिला पोलिसांनी इशारा देऊन सोडले आहे. तसेच तिला यापुढे असे कृत्य न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येतात. यामुळे शिवानीला सर्व आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Location :
Rajasthan
First Published :
November 20, 2024 2:32 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पिस्तूलसह बनवते रिल्स, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, लॉरेन्स बिश्नोईनंतर आता होतेय या 'लेडी डॉन'ची चर्चा


