health tips : हिवाळ्यात केस गळण्याचं टेन्शन, या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं, काय कराल?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
health tips - हिवाळ्यात अनेकांचे केस मोठ्या प्रणामात गळतात. केसांमध्ये डँड्रफही पाहायला मिळतो. बाहेरच्या कोरड्या हवेमुळे डोक्यावरील ओलावाही सुकतो, यामुळे केस पातळ होतात आणि गळू लागतात. यामुळे यावर नैसर्गिक उपाय करावेत, असा सल्ला तज्ञ देतात.
शशिकांत कुमार ओझा, प्रतिनिधी
पलामू - हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. या काळात चेहऱ्यासह केसांचीही समस्या पाहायला मिळते. अनेकांचे केस मोठ्या प्रणामात गळतात. केसांमध्ये डँड्रफही पाहायला मिळतो. बाहेरच्या कोरड्या हवेमुळे डोक्यावरील ओलावाही सुकतो, यामुळे केस पातळ होतात आणि गळू लागतात. यामुळे यावर नैसर्गिक उपाय करावेत, असा सल्ला तज्ञ देतात.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी -
याबाबत रिजवाना मेकओवर यांनी महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, हिवाळ्यात केसांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हिवाळ्यात केसांना शॅम्पू लावत असाल तर अर्धा तास आधी केसांना तेल लावा. यामुळे शॅम्पू केल्यानंतरही केसांची आर्द्रता कायम राहण्यास मदत होईल.
advertisement
- हिवाळ्यात जास्त केस धुवू नये. यामुळे केसांना पोषण देणारे नैसर्गिक तेल संपते. तसेच जर तुम्ही सातत्याने केस धुवत असाल तर तुमचे केस कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे महिन्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा केस धुवावेत.
- सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. यामुळे अनेक महिला हिट स्टायलिंगही करतात. मात्र, यापासून बचाव करायला हवा. असे केल्याने केसात ब्लो ड्राय होतो. यामुळे केस गळण्याची शक्यता वाढते. विना हिट केस वाळवल्याने केस चमकदार, स्वस्थ आणि मजबूत असतात.
advertisement
- हिवाळ्यात तेलाची मालिश गरजेची आहे. केसांना आरामासोबत केस गळतीही यामुळे थांबते. यादरम्यान, ऑलिव्ह ऑइल आणि आलमंड ऑइल वापरावे. तसेच आठवड्यातून दोन वेळा केसांना हे तेल वापरावे.
- यासोबत आहाराचीही काळजी घ्यावी. व्हिटामिन, मिनरल्स युक्त आहाराचे सेवन गरजेचे आहे. तसेच हिवाळ्यात काहीजण कमी पाणी पितात. मात्र, हिवाळ्यात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. हिरव्या भाज्या खाव्यात. यामुळे केसगळती कमी होते.
advertisement
सूचना - ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Palamu,Jharkhand
First Published :
November 20, 2024 1:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
health tips : हिवाळ्यात केस गळण्याचं टेन्शन, या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं, काय कराल?


