जमिनीचा 100 टक्के वापर, ऊसाच्या शेतीत घ्या हे आंतरपीक, दोन महिन्यातच होणार मोठा फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Intercropping in Sugarcane : ऊसाचे पिक तयार व्हायला 1 वर्षे लागते. त्यामध्ये ऊसाच्या दोन लाइनमध्ये 75 सेंटीमीटरचे म्हणजे 2 फूट अंतर असावे, असे तज्ज्ञ सांगतात. भारतात अनेक शेतकरी ही 2 फुटाची जागा खाली सोडतात. तर हिरव्या मिरचीचे पीक हे 60 ते 65 दिवसात तयार होते. यातून शेतकरी आंतरपीक घेऊन चांगला नफा कमावू शकतात. (सिमरनजीत सिंग/शाहजहांपूर, प्रतिनिधी)
पंत चिली-1 हे जातीचे बियाणे चांगल्या उत्पादनासाठी आणि चवीसाठी ओळखले जाते. याचे प्रती हेक्टर 75 क्विंटल उत्पादन होते. पिकल्यावर व खुडल्यावर हेक्टरी 1.5 टन पर्यंत उत्पादन मिळते. ही एक मोज़ेक आणि लीफ कर्ल व्हायरस प्रतिरोधक जाती आहे. या जातीची पहिली तोडणी 60 ते 65 दिवसांत करता येते. ही जात उसाच्या आंतरपीकासाठी उत्तम आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अर्का मेघनापासून तुम्ही प्रति हेक्टर 300 ते 350 क्विंटल हिरवी मिरची आणि 5 टन कोरडी मिरची प्रति हेक्टर उत्पादन घेऊ शकता. 55 ते 60 दिवसात तुम्ही पहिली तोडणी करू शकता. ही मिरची पिकल्यावर लाल होते. (सूचना-ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.)


