TRENDING:

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी

Last Updated:

अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं. मागील एक ते दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. विजय कदम यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भुमिका निभावल्या होत्या. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 1980-90च्या दशकात विजय कदम यांनी अनेक दमदार सिनेमात काम केलं. प्रमुख कॉमेडी हिरो म्हणून त्यांनी केलं आहे. मराठीतील एक हरहुन्नरी अभिनेता अशी त्यांची ओळख होती.
 विजय कदम यांचं निधन
विजय कदम यांचं निधन
advertisement

मराठी सिनेमेच नाही विजय कदम यांनी मराठी रंगभूमी देखील गाजवली. अनेक हिट मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटकं आहेत. ती परत आलीये ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बाबुराव तांडेल ही भुमिका साकारली होती. या मालिकेत अनेक वर्षांनी विजय कदम प्रेक्षकांसमोर आले होते.

advertisement

( Hina Khan : 'पाय सुन्न पडले तरी...' कॅन्सरशी झुंज, आजारपणातही हिना खानने सोडलं नाही हे काम; तुम्ही कराल कौतुक )

मे 2023 रोजी विजय कदम यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू झाले. त्यांच्यावर किमो थेरपी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. मे ते डिसेंबर या काळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर दोन महिने त्यांची तब्येत ठीक होती. फेब्रुवारी महिन्यात त्यांना एसिडिटीचा अटॅक आला आणि त्यांची तब्येत पुन्हा ढासळली. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. अखेर 10 ऑगस्ट रोजी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीत अपयश का येते? कोणत्या होतात व्यावसायिक चुका, कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
सर्व पहा

विजय कदम यांना त्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या पत्नीनं आणि मुलानं खंबीर साथ दिली. विजय कदम स्वत: प्रचंड सकारात्म विचार करणारे असल्यानं त्यांची ट्रिटमेंट सुरळीत सुरू होती. अभिनेते विजय पाटकर, जयवंत वाडकर, मंगेश देसाई, सुशांत शेलार या मराठी कलाकारांनाही त्यांना महत्त्वाची मदत केली होती. त्याच्या जाण्यानं मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल