विजयच्या प्रत्येक रोड शो, शक्तीप्रदर्शानात लोक तुफान गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे 'विजय'. दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय आता केवळ अभिनयापुरता मर्यादित राहिला नसून, त्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, या प्रवासातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे विजयने जाहीर केलेली त्याची संपत्ती!
advertisement
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विजयने त्याची संपत्ती किती हे सांगितलं. त्याची संपत्ती पाहून डोळेच विस्फारतील सध्या त्याच्या संपत्तीचे कागदपत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
बँकेत कोट्यवधी रुपये!
एखाद्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त रक्कम विजयच्या फक्त बँक खात्यावर आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, विजयकडे सुमारे ४०४.५८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. विशेष म्हणजे, शालिग्रामम इथे एका बँकेच्या शाखेत त्याच्या बचत खात्यात तब्बल २१३.३६ कोटी रुपये जमा आहेत. याशिवाय ५.७९ कोटी रुपयांच्या एफडी त्याच्या नावावर आहेत. केवळ विजयच नाही, तर त्याची पत्नी संगीता स्वर्णलिंगम यांच्याकडेही १५.५१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
लक्झरी गाड्या आणि हिरे-माणकांचा थाट
विजयला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे, हे त्याच्या गॅरेजमधील ताफ्यावरून स्पष्ट होतं. त्याच्याकडे ६ कोटी रुपये किमतीच्या BMW 530 आणि Toyota Vellfire सारख्या आलिशान गाड्या आहेत. दागिन्यांच्या बाबतीतही थलापती मागे नाही. विजयकडे ८८३ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत १.२० कोटी रु.) आहेत, तर पत्नी संगीता यांच्याकडे ३९१ तोळे सोन्याचे दागिने असून त्याची किंमत ४ कोटी रुपयांच्या घरात आहे. एवढंच नाही, तर या कुटुंबाकडे १ कोटी रुपये किमतीचे हिरेदेखील आहेत.
