TRENDING:

मुंबई-पुणे सोडून थेट उत्तराखंडात गाठलं, त्रियुगीनारायण मंदिरात विशाल-अक्षयाचा पारंपरिक विवाह, VIDEO

Last Updated:

Vishal Nikam Wedding at Uttarakhand : विशाल आणि अक्षया यांनी नेमकं लग्न कुठे केलं याची सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर विशालने त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी अखेर लग्नबंधनात अडकले. विशाल आणि अक्षयाचं लग्न हे मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात वेगळं लग्न ठरलं आहे. 10 फेब्रुवारी हा दिवशी म्हणजेच विशालच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने अक्षयासोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लग्नाची माहिती दिली होती. विशाल आणि अक्षया यांनी नेमकं लग्न कुठे केलं याची सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर विशालने त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
News18
News18
advertisement

विशाल आणि अक्षया यांनी लग्नासाठी खास ठिकाणाची निवड केली. मुंबई किंवा पुण्यात थाटामाटात लग्न करण्याऐवजी त्यांनी उत्तराखंडमधील प्रसिद्ध त्रियुगीनारायण मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. गंगा घाट परिसरातील हे मंदिर हिंदू धर्मात शाश्वत वैवाहिक जीवनाचं पवित्र स्थळ मानलं जातं. पौराणिक कथांनुसार भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह याच ठिकाणी झाला होता अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक जोडपी येथे विवाह करण्यास प्राधान्य देतात.

advertisement

( प्रेमाला हळदीचा रंग लागला! विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरच्या हळदीचा थाट; 'या' रंगाच्या साडीला नवरीची पसंती )

विशाल आणि अक्षया यांच्या विवाह सोहळ्याला फक्त जवळचे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. साधेपणा आणि परंपरा जपत दोघांनी मंदिराबाहेर पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. लग्नसोहळ्याचा सुंदर व्हिडीओ विश्लाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नाचा खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

advertisement

लग्नात अक्षयाने ऑरेंज कलरचा सुंदर घागरा परिधान केला होता. पारंपरिक दागिन्यांसह तिचा लूक उठून दिसत होता. तर विशालने ग्रीन कलरची धोती आणि व्हाइट उपरण परिधान केलं होतं. दोघांचाही साधा पण देखणा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

विशालच्.या रोमँटिक पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओसह विशालनं पोस्टमध्ये लिहिलंय, "चंद्रभागेसारखं प्रेम आपलं सखी, मी तुझ्यात सामावून जाईन, रुसली जरी तू रखुमाई सारखी, मी सावळा विठ्ठल होऊन जाईन, कायम तुझा रुसवा काढून, तुला आयुष्यभर मनवत राहीन." विशाल आणि अक्षया यांच्या लग्नाचा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

विशाल आणि अक्षया यांनी स्टार प्रवाहवरील साता जल्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेवेळीच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जात आहे. आता दोघांची लव्ह स्टोरी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
मुंबई-पुणे सोडून थेट उत्तराखंडात गाठलं, त्रियुगीनारायण मंदिरात विशाल-अक्षयाचा पारंपरिक विवाह, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल