विवेक अग्निहोत्री यांनी महाराष्ट्रीयन जेवणाला गरीबांचं जेवण म्हटलं ज्यामुळे सध्या त्यांच्यावर ट्रोलिंगची झोड होताना दिसत आहे. हा संवाद खरं तर विनोदाच्या ओघात झाला होता, मात्र प्रेक्षकांनी तो लगेच पकडला आणि चर्चेला उधाण आलं. काहींनी त्यांच्यावर टीका केली.
'द बंगाल फाइल्स' वरुन मोठा राडा! विवेक अग्निहोत्रीविरोधात FIR दाखल; नेमकं प्रकरण काय?
advertisement
विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी नुकतीच Curly Tales ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दोघांनी जेवणाच्या सवयींविषयी सांगितलं. विवेक अग्निहोत्री हे मूळ दिल्लीचे. कबाब, तुपकट पराठे, चिकन, मसालेदार मटण ही त्यांची चव. लग्नानंतर पल्लवीने त्यांना साधं मराठमोळं जेवण वरण-भात, कढी-भात, थालीपीठ, भाकरी–पिठलं खाऊ घातलं. यावर मजेशीर किस्सा सांगताना विवेक म्हणाले,"माझ्यासाठी हा एकदम कल्चर शॉक होता. इतकं साधं जेवण! मला वाटायचं, अरे हे काय गरीबांचं जेवण? पण नंतर लक्षात आलं की मराठी जेवण हे खूप हेल्दी आणि सिम्पल आहे."
पल्लवीनेही हसत सांगितलं की, विवेकला जेव्हा पहिल्यांदा वरण-भात खायला दिलं तेव्हा तो चेहऱ्यावर विचित्र हावभाव करून म्हणाला “हे काय? मसाला कुठे आहे?”
दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी म्हणाले, महाराष्ट्रीयन जेवण गरिबांचं जेवण नाहीये. मराठी जेवण गरिबांचं जेवण नाहीये तुझी बायको तसं बनवत असेल. कमी नॉलेजमुळे तुला ब्लेमही करु शकत नाही, त्याला शेण खायला द्या, अशा अनेक कमेंट करत लोक विवेक यांना ट्रोल करत आहेत.
