आज एका चित्रपटासाठी 100 कोटींहून अधिक मानधन घेणाऱ्या सलमानने त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं होतं माहितीय? 1988 मध्ये आलेल्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटात तो सहाय्यक भूमिकेत होता आणि त्यासाठी त्याला फक्त 11,000 रुपये मिळाले होते. त्यानंतर 1989 मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया'ने इतिहास घडवला आणि तो रातोरात सुपरस्टार झाला.
advertisement
केवळ अभिनेता नाही, तर 'गॉडफादर'
बॉलिवूडमध्ये अनेकांना लाँच करण्याचं काम सलमानने केलं आहे. मग ती कतरिना कैफ असो, सोनाक्षी सिन्हा असो वा अर्जुन कपूर. कोणाचं करिअर सावरण्यासाठी किंवा कोणाला संधी देण्यासाठी सलमान नेहमीच 'मोठ्या भावा'च्या भूमिकेत असतो. म्हणूनच त्याला इंडस्ट्रीचा 'गॉडफादर' मानलं जातं.
वयाच्या 60 व्या वर्षीही 'बॅचलर' आणि 'फिट'
सलमान खान 60 वर्षांचा झालाय यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आजही त्याचा वर्कआउट आणि फिटनेस पाहून तरुण कलाकारही चकित होतात. लग्नाच्या प्रश्नावर आजही तो तितक्याच मिश्किलपणे उत्तर देतो, पण त्याच्या 'बॅचलर' असण्यावर आजही हजारो तरुणी फिदा आहेत.
काय आहे भाईजानचं खरं नाव?
आज 'सलमान खान' हा एक ब्रँड बनला असला, तरी त्याच्या अधिकृत कागदपत्रांवरचं नाव खूप मोठं आहे. सलमानचं पूर्ण नाव 'अब्दुल रशीद सलीम सलमान खान' (Abdul Rashid Salim Salman Khan) असं आहे. त्याचे वडील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान आणि आजोबांचे नाव जोडून हे नाव तयार झालं आहे. सिनेसृष्टीत आल्यावर सुटसुटीतपणासाठी त्याने नाव छोटं करून 'सलमान' असं ठेवलं.
सलमानबद्दल काही हटके आणि गुपित गोष्टी
रायटिंगची आवड सलमानला सुरुवातीला लेखक बनायचं होतं. त्याने 'चंद्रमुखी' आणि 'वीर' यांसारख्या चित्रपटांच्या कथा लिहिण्यास मदत केली आहे.
सलमान एक उत्तम चित्रकार आहे. त्याचे स्केचेस आणि पेन्टिंग्स पाहून अनेक मोठे कलाकारही त्याचं कौतुक करतात.
वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सलमानने 'बिईंग ह्युमन' संस्थेच्या माध्यमातून हजारो गरीब मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी काम केलं आहे.
'मैने प्यार किया'चा तो लाजाळू 'प्रेम' असो, 'दबंग'चा चुलबुल पांडे असो वा 'टायगर', सलमानने प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. 60 वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही सलमानचा 'स्वॅग' आजही तोच आहे.
