गुरुवारी चहल आणि धनश्री कोर्टाबाहेर दिसले. घटस्फोटानंतर दोघांनीही माध्यमांसमोर मौन बाळगले आणि काहीही न बोलता आपापल्या गाड्यांमधून निघून गेले. पण क्रिकेटपटू चहलने शब्दांतून नाही तर त्याच्या टी-शर्टद्वारे खूप काही सांगितले. त्याच्या टी-शर्टवरील शब्दांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
युझवेंद्र चहलला मोठा झटका..! 60 कोटी नाही, धनश्री वर्माला द्यावी लागणार इतक्या कोटींची पोटगी
advertisement
युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला टोमणा मारला?
युझवेंद्र चहल त्याच्या वकिलासह फॅमिली कोर्टात पोहोचला. यावेळी, तो चेहऱ्यावर मास्क आणि सनग्लासेस घातलेला दिसला. जेव्हा तो कोर्टात जात होता तेव्हा त्याने या टी-शर्टवर जॅकेट घातले होते. पण जेव्हा घटस्फोट झाला आणि तो कोर्टातून परतत होता तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्या काळ्या टी-शर्टकडे गेले. ज्यावर लिहिले होते, 'Be Your Own Sugar Daddy'.
युझवेंद्र चहलच्या वकिलाने सांगितले की दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. त्याच वेळी, बार अँड बेंच वेबसाइटनुसार, चहल आणि धनश्री यांच्यात 4.75 कोटी रुपयांच्या तडजोडीसाठी चर्चा झाली आहे. दोघेही गेल्या 2 वर्षांपासून वेगळे राहत होते. लग्नाला फक्त चार वर्षे झाली होती.
चहलच्या वतीने कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. जिथे त्याने सांगितले की त्याने अर्धी रक्कम देखील सेटलमेंट म्हणून दिली आहे. त्यामुळे त्यांचा सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी देखील माफ करावा, त्यानंतर न्यायालयाने हे मान्य केले.
दरम्यान, 2020 मध्ये लग्नबंधनात अडकलेले युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या जवळजवळ एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. त्यांचा आज अखेर अधिकृतरित्या घटस्फोट झाला.