पांढरी नंबर प्लेट : भारतात पांढरी नंबर प्लेट सर्वात सामान्य आहे, जी खाजगी वाहनांवर दिसते. या प्लेटवर पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळ्या रंगात नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो. ही नंबर प्लेट त्या वाहनांसाठी आहे जी वैयक्तिक वापरासाठी आहेत. अशी वाहने कोणत्याही प्रकारचा माल किंवा प्रवासी वाहून नेऊ शकत नाहीत आणि ही वाहने भाड्यानेही दिली जाऊ शकत नाहीत.
advertisement
पिवळी नंबर प्लेट : पिवळी नंबर प्लेट विशेषतः व्यावसायिक वाहनांसाठी असते. यात पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळ्या रंगात नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो. टॅक्सी, ऑटो आणि मालवाहू वाहनांसारख्या सार्वजनिक किंवा व्यावसायिक वाहनांवर या प्लेट्स लावल्या जातात. या वाहनांचा कर दरही खाजगी वाहनांपेक्षा वेगळा असतो.
हिरवी नंबर प्लेट : हिरव्या नंबर प्लेटची संख्या अलीकडच्या काळात झपाट्याने वाढली आहे, कारण या प्लेट्स केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी आहेत. जर नोंदणी क्रमांक पांढऱ्या रंगात लिहिला असेल, तर ते खाजगी इलेक्ट्रिक वाहन आहे. दुसरीकडे, जर क्रमांक पिवळ्या रंगात असेल, तर ते व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन आहे. या वाहनांच्या चालकांकडे व्यावसायिक वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
निळी नंबर प्लेट : निळ्या नंबर प्लेटचा वापर मुख्यतः परदेशी दूतावासाच्या वाहनांवर केला जातो. या प्लेट्सवर पांढऱ्या रंगात नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो आणि त्यावर CC, UN आणि CD असे तीन प्रकारचे कोड असतात. या प्लेट्स विशेषतः सरकारी आणि दूतावासाच्या वाहनांसाठी निर्धारित आहेत.
लाल नंबर प्लेट : लाल नंबर प्लेटचा उपयोग तात्पुरता वाहनाची नोंदणी माहिती रेकॉर्ड करण्यासाठी केला जातो. त्यावर पांढऱ्या रंगात नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो आणि कायमस्वरूपी नोंदणी मिळेपर्यंत ती वैध असते. ही प्लेट फक्त एक महिन्यासाठी वैध असते आणि अनेक राज्ये या वाहनांना रस्त्यावर चालण्याची परवानगी देत नाहीत.
बाण असलेली नंबर प्लेट : या नंबर प्लेट्स विशेषतः लष्करी वाहनांसाठी असतात. या प्लेटवर बाणाचे चिन्ह असतात, जे वाहनाचे खरेदी वर्ष दर्शवतात. यानंतर, लष्करी तळाचा कोडही लिहिलेला असतो. या प्लेट्स केवळ लष्करी वाहनांसाठी असतात आणि इतर कोणत्याही वाहनासाठी वापरल्या जाऊ शकत नाहीत.
काळी नंबर प्लेट : काळ्या नंबर प्लेटवर पिवळ्या रंगात नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो आणि ही प्लेट विशेषतः लक्झरी हॉटेल्सच्या वाहनांसाठी असते. ते व्यावसायिक वाहन मानले जाते, परंतु त्यांच्या चालकांकडे व्यावसायिक वाहनाचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक नसते.
हे ही वाचा : Viral Video: Reels च्या नादात मुर्खपणा; चुकून वापरला सुपर-ग्लु, आता तोंडातून निघत नाही 'हूं का चू'
हे ही वाचा : एकही जीव वाचणार नाही, सगळं काही नष्ट होणार! शास्त्रज्ञांनी सांगितली पृथ्वीच्या विनाशाची तारीख
