Viral Video: Reels च्या नादात मुर्खपणा; चुकून वापरला सुपर-ग्लु, आता तोंडातून निघत नाही 'हूं का चू'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर लोक प्रँक किंवा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अशा काही गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचं स्वत:चं नुकसान होतं त्यानंतर कधीकधी पश्चातापाची देखील वेळ येते. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं.
मुंबई : सोशल मीडियावर अतरंगी व्हिडीओची कमी नाही. इथे दिवसेंदिवस वेगवेगळे व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होतात. खरंतर कधीकधी लोकांना त्या व्हिडीओमधील एखादी गोष्ट इतकी आवडते की लोक तो व्हिडीओ वारंवार पाहातात आणि आपल्या मित्रांना शेअर करतात.
खरंतर लोक प्रँक किंवा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अशा काही गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचं स्वत:चं नुकसान होतं त्यानंतर कधीकधी पश्चातापाची देखील वेळ येते. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं.
या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला त्या व्यक्तीच्या कृत्यावर नक्कीच हसू येईल शिवाय त्याची दया देखील येईल.
advertisement
खरंतर या तरुणाने एक सुपर ग्लू घेतला आणि तो आपल्या ओठांना लावला आणि आपले ओठ चिकटवले. हा सगळा प्रकार त्यांनी फोनमध्ये कैद केला. पण नंतर मात्र त्याची अवस्था खूपच वाईट झाली.
खरंतर या तरुणीचे ओठ असं काही एकमेकांना चिकटले की जणू ते लहापणापासूनच असे होते. यानंतर या तरुणाला कळून चुकलं की आपण खूप मोठी चुक केली आहे. अखेर त्याच्यावर रडण्याची पाळी आली. पण त्याचा काही फायदा झाला नाही कारण त्याचे ओठ काही उघडलेच नाही. हा व्हिडीओ इकडेच संपला आहे.
advertisement
advertisement
या तरुणासोबत पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. पण कदाचित त्याच्याकडे आता डॉक्टरकडे जाण्याशिवाय काहीही पर्याय उरला नसावा असंच वाटतंय.
लोक प्रसिद्धीसाठी अशा विचित्र गोष्टी करतच असतात या तरुणाने देखील असंच केलं. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडल आहे. त्यामुळे त्याने हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video: Reels च्या नादात मुर्खपणा; चुकून वापरला सुपर-ग्लु, आता तोंडातून निघत नाही 'हूं का चू'


