TRENDING:

मध्यरात्री गोवा हादरलं, नाईट क्लबमध्ये भीषण स्फोट, 23 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated:

Goa Night Club Blast: मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Goa Night Club Fire: मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण नाईट क्लब जळून खाक झाला, त्यात एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी निश्चित केलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः देखील मृतांच्या संख्येची पुष्टी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मृतांमध्ये बहुतेक किचनमधील कामगार होते, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, मृतांमध्ये तीन ते चार पर्यटकांचाही समावेश आहे.
News18
News18
advertisement

आगीची माहिती मिळताच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, २३ जणांपैकी तीन जण भाजल्याने आणि उर्वरित लोक गुदमरल्याने मृत्युमुखी पडले. प्राथमिक माहितीवरून असे दिसून येते की नाईटक्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केलं नव्हतं. सावंत म्हणाले की, क्लब व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लबला काम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

advertisement

भीषण आग कशी सुरू झाली

नाईटक्लबमध्ये रात्री १२:०० वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. आगीमुळे क्लबमध्ये मोठी घबराट पसरली आणि लोक इकडे तिकडे पळू लागले. आग आटोक्यात आणेपर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला. काही जण भाजल्याने मरण पावले, तर काही जण गुदमरल्याने मरण पावले. मध्यरात्रीनंतर रोमियो लेनजवळील बर्च येथे ही आग लागली. हे ठिकाण नाईट क्लब आणि पार्टीसाठी लोकप्रिय आहे.

advertisement

मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि मक्याची पुन्हा दर वाढ, कांद्याला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "पर्यटनाच्या हंगामातील ही एक दुःखद घटना आहे. आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई करू." दरम्यान, गोवा पोलीस प्रमुख आलोक कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आहे. दरम्यान, स्थानिक भाजप आमदार मायकल लोबो म्हणाले, "सर्व २३ मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत आणि बांबोलीम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत."

advertisement

मराठी बातम्या/गोवा/
मध्यरात्री गोवा हादरलं, नाईट क्लबमध्ये भीषण स्फोट, 23 जणांचा जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल