TRENDING:

Badlapur : बदलापूरमधील गेमचेंजर प्लॅन; कल्याण-कर्जत सुसाट गाठता येणार

Last Updated:

Badlapur New Flyover Project : बदलापूर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता शहरातील नागरिकांचा प्रवास आता काही प्रमाणात सोपा होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बदलापूर : बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत वाढते लोकाचे स्थलांतर आणि वाढती वाहने त्यामुळे होणारी मोठी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बदलापूरात एक नवा मेगा प्लॅन जाहीर झालेल आहे.ज्यात बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या आणखी एक नवा उड्डाणपुल होणार आहे.
बदलापूरमध्ये नवीन उड्डाणपूल उभारला जाणार आहे
बदलापूरमध्ये नवीन उड्डाणपूल उभारला जाणार आहे
advertisement

मुंबई प्रदेश महानगर विकार प्राधिकरणामार्फत या नव्या उड्डाणपूल कामासाठी प्रकल्प अहवाल करण्यासाठी निविदा मागवल्या गेल्या आहेत. येत्या 180 ते 184 दिवसांत आराखडा तसेच अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

बदलापूर उड्डाणपूलाचा मार्ग कसा असणार?

बदलापूर शहराच्या पश्चिमेतील बॅरेज रस्त्यावरून सुरू होत असलेला हा नवीन उड्डाणपूल कल्याण-कर्जत रेल्वे मार्ग ओलांडून पूर्वेकडील औद्योगिक भागातील होप कंपनीजवळ बदलापूर-कर्जत रस्त्यावर उतरेल. त्यामुळे शहरात पूर्व ते पश्चिम प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.

advertisement

आता बदलापूर शहराच्या हद्दीतून जवाहरलाल नेहरुन्यास ते बडोदे द्रुतगती महामार्ग आणि बदलापूर ते नवी मुंबई असा महामार्ग जात आहे. त्यात शहरात पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी नागरिकांना फक्त एकच उड्डाणपूल खुला आहे, त्यामुळे शहरातील कोणत्याही भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मध्यवर्ती भागातीलच उड्डाणपूल वापरावा लागतोय. त्यामुळे या उड्डाणपूलावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते.

advertisement

पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल कुठे होणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना या मार्गावर अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत असते, त्यामुळे शहरात नव्या उड्डाणपूलाची मागणी होती. याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहराते प्रवेशद्वार असलेल्या बेलवलीतील शिवमंदिर तलाव ते कामेल शाळेपर्यंत या नव्या उड्डाणपुलाची उभारणी केली जात आहे.येत्या काही दिवसांत हा उड्डाणुल झाल्यास शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Badlapur : बदलापूरमधील गेमचेंजर प्लॅन; कल्याण-कर्जत सुसाट गाठता येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल