TRENDING:

Mumbai Local Megablock: प्रवाशांची गैरसोय होणार, मध्य रेल्वेवर तीन दिवस रात्रकालीन मेगाब्लॉक; वाचा सविस्तर

Last Updated:

मध्य रेल्वेवरील कर्जत- भिवपूरी आणि कल्याण- डोंबिवलीर मार्गावर रात्रकालीन स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: मध्य रेल्वेवरील कर्जत- भिवपूरी मार्गावर रात्रकालीन स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. कर्जत आणि भिवपुरी मार्गावर 06 मार्च ते 9 मार्चपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या काळामध्ये रेल्वेकडून या मार्गावर विशेष कामं हाती घेण्यात आली आहेत. कर्जत- भिवपूरी अप आणि डाऊन मार्गावर शनिवार आणि रविवारी मध्यरात्री 01.55 ते 03.10 दरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमयूटीपी 3 अंतर्गत पनवेल- कर्जत मार्गावर पायाभूत कामे करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मेल-एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.
News18
News18
advertisement

ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम- एलटीटी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद- सीएसएमटी हुसैनसागर एक्स्प्रेस या ट्रेन कर्जत- पनवेल- दिवा मार्गे चालवल्या जाणार आहे. कल्याण स्थानकावरील चढणाऱ्या आणि उतरणार्‍या प्रवाशांसाठी या रेल्वेगाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येणार आहे. उशिरा धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्या आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांनाही त्याच मार्गानुसार चालवले जाणार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवारी आणि सोमवारी रात्री ब्लॉक कालावधीत बदलापूर आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

advertisement

शनिवारचे रात्रकालीन लोकल वेळापत्रक

शनिवारी- रविवारी ब्लॉकच्या काळात बदलापूर- कर्जत लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. कर्जतसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री 11.30 वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल ठाणे- कर्जत असेल. जी लोकल ठाण्यावरून पहाटे 5 वाजता सुटेल. तर, अप दिशेने ब्लॉकनंतरची पहिली लोकल कर्जत- सीएसएमटी असेल. जी लोकल कर्जतवरून येथून मध्यरात्री 03.35 वाजता सुटेल. आणि सीएसएमटीवरून मध्यरात्री 12.12 वाजता सुटणारी कर्जत लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. मध्यरात्रीची 02.30 वाजता कर्जत- सीएसएमटी लोकल कर्जतवरून न सुटता ठाण्यावरून पहाटे 4 वाजता सुटेल. कर्जत- ठाणे लोकल सेवा रद्द असेल.

advertisement

रविवारचे रात्रकालीन लोकल वेळापत्रक

ब्लॉकपूर्वीची कर्जतसाठी शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री 11.30 वाजता सुटेल. सीएसएमटीवरून सुटणारी शेवटची लोकल रात्री 12.12 वाजता सुटेल. ती लोकल कर्जतऐवजी बदलापूरपर्यंतच चालवली जाणार आहे. या लोकलची सेवा बदलापूर- कर्जत सेवा रद्द केली जाईल. तर, अप दिशेने जाणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर- सीएसएमटी लोकल असेल. जी लोकल बदलापूरवरून रात्री 11.29 वाजता वाजता सुटेल. डाऊन दिशेने जाणारी ब्लॉकनंतरची पहिली लोकल ठाणे- कर्जत असेल. जी लोकल ठाण्यावरून पहाटे 5 वाजता सुटेल. अप दिशेने जाणारी ब्लॉकनंतरची पहिली लोकल कर्जत – सीएसएमटी असेल. ही लोकल कर्जतवरून मध्यरात्री 03.35 वाजता सुटेल. अप दिशेने जाणारी पहिली लोकल बदलापूर – सीएसएमटी लोकल बदलापूरवरून रात्री 03.03 वाजता वाजता सुटेल.

advertisement

कल्याण- डोंबिवली स्थानकादरम्यान 06 मार्च, 07 मार्च, 08 मार्च आणि 09 मार्च या काळात मध्यरात्री स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान तिसऱ्या पत्रीपूलाच्या बांधकामासाठी गर्डर लाँच करण्यासाठी शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी ब्लॉक घेतला जाणार आहे.

06 आणि 07 मार्च 2026 रात्री 11.00 ते पहाटे 3.00

advertisement

डोंबिवली आणि कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग, पाचवी आणि सहावी मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 12298 पुणे-अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल, ट्रेन क्रमांक 22537 गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक 11062 जयनगर-एलटीटी एक्सप्रेस कल्याण आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील.

07 आणि 08 मार्च 2026 रात्री 01.45 ते पहाटे 04.15

अप आणि डाऊन मार्गावर डोंबिवली आणि कल्याण दरम्यान पाचवी मार्गिकेवर ट्रेन चालवल्या जाणार आहे. ट्रेन क्रमांक 18030 शालिमार-एलटीटी एक्सप्रेस, 12810 हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, 20104 गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस आणि 11140 होसापेटे-सीएसएमटी एक्सप्रेस या सर्व एक्सप्रेस सहाव्या मार्गिकेवरून चालवल्या जाणार असून 5 ते 10 मिनिटे उशिराने धावणार आहे.

ब्लॉक काळात डोंबिवली ते कल्याण दरम्यानच्या अप स्लो आणि फास्ट सेवा आणि डाउन स्लो आणि फास्ट सेवा रद्द राहतील. सीएसएमटीहून 05.16 वाजता सुटणारी सीएसएमटी- अंबरनाथ लोकल आणि अंबरनाथहून 03.43 वाजता सुटणारी अंबरनाथ-सीएसएमटी लोकल रद्द असेल. सीएसएमटीहून मध्यरात्री 12.08 वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालवली जाणार आहे. कर्जत- सीएसएमटी लोकल 02.30 वाजता कर्जतहून सुटणार आहे आणि ठाणे स्थानकावरून 04.00 वाजता सुटेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

डाऊन स्लो मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल कल्याणहून 01.37 वाजता सुटणारी सीएसएमटी- कसारा लोकल असेल. अप स्लो मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल अंबरनाथ-सीएसएमटी लोकल असेल जी कल्याणहून 04.21 वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वी अप स्लो मार्गावरील शेवटची लोकल आणि ब्लॉकनंतर डाउन स्लो लाईनवरील पहिली लोकल वेळापत्रकानुसार धावेल. सोमवारी मेगाब्लॉकचा कोणताही परिणाम होणार नाही.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Mumbai Local Megablock: प्रवाशांची गैरसोय होणार, मध्य रेल्वेवर तीन दिवस रात्रकालीन मेगाब्लॉक; वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल