TRENDING:

Local : कल्याण-डोंबिवलीकरांना रेल्वेचा 'शॉक'; ठाकुर्ली, कोपर स्थानकांवरील लोकल थांबे तडकाफडकी रद्द; कारण काय?

Last Updated:

Mumbai Local News : जर तुम्हीही लोकलने कोपर किंवा ठाकुर्ली स्थानकात उतरतात तर ही बातमी तुमच्यासाठी. या स्थानकावरील थांबा रद्द होणार आहे. नेमके याचे कारण काय याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. जर तुम्ही लोकलने ठाकुर्ली किंवा कोपर स्थानकात उतरत असाल तर हे थांबे आता बंद होणार आहे. नक्की यामागे मध्य रेल्वेने कोणते कारण दिलेले आहे आणि प्रवाशांना किती दिवसांसाठी या त्रासातून जावे लागणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या.
तुमची लोकल ठाकुर्ली-कोपरला थांबणार नाही;
तुमची लोकल ठाकुर्ली-कोपरला थांबणार नाही;
advertisement

मध्य रेल्वेकडून विशेष ब्लॉक

दररोज हजारोच्या संख्येने प्रवासी कल्याण-डोंबिवली सह ठाकुर्ली अन् कोपर स्थानकात उतरत असतात. अनेक मुख्य स्थानकापैंकी हे दोन स्थानक आहेत. मात्र मध्य रेल्वेवरील ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील असलेल्या फलाटांचा विस्तार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे विशेष वाहतूक आणि पॉवरब्लॉक घेण्यात येणार असून शनिवारी मध्यरात्रीपासून सुरु होईन रविवार सकाळपर्यंत हे काम चालणार आहे.

advertisement

ठाणे-डोंबिवलीत फलाट विस्ताराचे काम सुरू

एवढेच नाही तर ठाणे स्थानकावरील फलाक क्रंमाक तीन आणि चार आणि डोंबिवली स्थानकावरील फलाट 1 अ,1 आणि 2 यांचाही विस्तार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून काम सुरु केले आहे. त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तो ब्लॉक शनिवारी साधारण रात्री 12 वाजता सुरु होईन रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरु राहील. या दरम्यान मुलुंड ते ठाणे- दिवा ते डोंबिवली या मध्ये काही लोकल सेवा

advertisement

तुमची लोकल ठाकुर्ली-कोपरला थांबणार नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

तसेच या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. काही गाड्यांच्या सुटण्याच्या स्थानकांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. फलाटांचा विस्तार केल्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत प्रवाशांनाच अधिक सुविधा मिळणार असून स्थानकांवरील गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Local : कल्याण-डोंबिवलीकरांना रेल्वेचा 'शॉक'; ठाकुर्ली, कोपर स्थानकांवरील लोकल थांबे तडकाफडकी रद्द; कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल