TRENDING:

Shocking Crime : शुद्ध हरपली अन् सर्व काही संपलं; डोंबिवलीत रिक्षाचालकासोबत घडलं भयंकर

Last Updated:

Dombivli News : डोंबिवलीतील एका रिक्षा चालकासोबत दोन व्यक्तींनी असं काही केलं तर सर्व शहर हादरले आहे. नक्की काय घडलं आणि पोलिस तपासात काय समोर आले ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : दोन भामट्यांनी रिक्षेत बसून एका व्यक्तीला गुंगीचे औषध देत त्याच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

नेमके घडले कसे?

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब माने (राहणारा अडवली ढोकळी, कल्याण पूर्व) हे नोकरदार असून गेल्या आठवड्यात ते डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कामानिमित्त आले होते. ते आपल्या भावाची रिक्षा घेऊन रुग्णालयात गेले होते. दुपारच्या सुमारास परत जात असताना डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पी.पी. चेंबर्स मॉलसमोर दोन व्यक्तींनी त्यांची रिक्षा थांबवली.

advertisement

आम्हाला निळजे येथील लोढा हेवन येथे जायचे आहे असे सांगून त्यांनी रिक्षेत बसण्याचा हट्ट केला आणि ते त्या रिक्षात बसले. मात्र आपण रिक्षाचालक नसल्याचे माने यांनी सांगितले तरीही दोघांनी जबरदस्तीने त्यांना तेथे जाण्यास सांगितले. निळजे येथील शिवाजी चौक परिसरात पोहोचल्यानंतर त्या दोघांनी शीतपेयाच्या बाटल्या आणल्या आणि त्यामधील एका बाटलीत त्यांनी गुंगीचे औषध मिसळले होते.

advertisement

माने यांनी शीतपेय पिण्यास नकार दिला तरीही जबरदस्तीने त्यांना ते पाजण्यात आले. त्यानंतर त्यांना गुंगी आली आणि पुढे काय झाले ते त्यांना आठवत नाही. दरम्यान दोघांनी रिक्षेचा ताबा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे 9 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 4 ग्रॅमची अंगठी आणि मोबाईल घेऊन पळ काढला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रिक्षा ड्रायव्हरच्या लेकीनं ठरवलं अन् गाव बदललं, खाकी वर्दीनं दिली मुलींना दिशा
सर्व पहा

दोन दिवसांनी माने हे काटई नाका परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking Crime : शुद्ध हरपली अन् सर्व काही संपलं; डोंबिवलीत रिक्षाचालकासोबत घडलं भयंकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल