TRENDING:

Shocking News : डोंबिवली हादरली! रेल्वे स्टेशनच्या लिफ्टमध्येच वृद्धासोबत घडला अनर्थ अन्...; शहरात खळबळ

Last Updated:

Dombivli : डोंबिवलीत भामट्यांनी अवघ्या 30 मिनिटांत दोन ज्येष्ठ नागरिकांसोबत मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डोंबिवली शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : डोंबिवलीत भामट्यांनी चलाखीने अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरात दोन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करत तब्बल 4 लाख 96 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
News18
News18
advertisement

नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास पी.पी. चेंबरसमोर साडीच्या दुकानाजवळ घडली. मीनाक्षी मांडेकर (वय 80) या महिलेशी दोन अनोळखी व्यक्तींनी संवाद साधला. त्यांनी 'आमच्या पंजाबी मालकाला अनेक वर्षांनंतर मुलगा झाला असून आम्ही प्रसाद वाटत आहोत'असे सांगत विश्वास पू्र्णपणे मिळवला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणाने सोन्याचे दागिने काढून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यास सांगितले. हातचलाखीने भामट्यांनी 4 लाख 70 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

advertisement

काही वेळात पुन्हा दुसरी धक्कादायक घटना

दुसरी घटना काही वेळातच डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या लिफ्टबाहेर घडली. श्रीकांत उपाध्ये (वय 69) यांच्या हातातील सोन्याची अंगठी पाहून 'रस्त्यावर चोरट्यांचा सुळसुळाट आहे, अंगठी जपून ठेवा' असे सांगत भामट्यांनी अंगठी हातात घेतली आणि लगेच पळ काढला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

या दोन्ही घटनांमुळे डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking News : डोंबिवली हादरली! रेल्वे स्टेशनच्या लिफ्टमध्येच वृद्धासोबत घडला अनर्थ अन्...; शहरात खळबळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल