सुखी संसाराचे स्वप्न भंगलं
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये एका सुशिक्षित महिलेने पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. ही महिला मुंबईतील एका कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. तिचा पती मर्चेंट नेव्हीत नोकरीला आहे. विवाहापूर्वी पतीचा एक अंडकोष काढण्यात आला होता ही महत्त्वाची वैद्यकीय माहिती त्याने आणि त्याच्या आई-वडिलांनी लपवून ठेवली असा आरोप महिलेने केला आहे.
advertisement
डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर महिला हादरली
लग्नानंतर पतीने तिला शारीरिक आणि मानसिक सुख देण्यास टाळाटाळ केली. पत्नीने संसार आनंदाने जगण्याची इच्छा व्यक्त केली मात्र पतीकडून तिला अपेक्षित साथ मिळाली नाही. दोघांनी एका डॉक्टरकडे तपासणी केली असता पतीची लैंगिक क्षमता कमी असल्याचे निदान झाले असे तक्रारीत सांगितले गेले आहे.
महिलेने ही बाब सासू-सासऱ्यांच्याही सांगितली होती मात्र त्यांनी तिची बाजू न घेता उलट तिचाच छळ केल्याचा आरोप आहे. मानसिक त्रास वाढत असल्याने अखेर महिलेने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान पतीने पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
