राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस यांच्यासोबत महायुती केली. राष्ट्रवादीत फुट पडली आणि अनेकजण अजित पवार गटात सामील झाले. रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यवेळी जिल्ह्यातील अनेकांनी सुनील तटकरे यांच्यासोबत जाणे पसंत केले. मात्र याला अपवाद ठरले त्यांचेच ज्येष्ठ बंधू माजी आमदार अनिल तटकरे हे राष्ट्रवादीत असले तरी त्यांनी स्थिर राहणे पसंत केले. काल त्यांनी अजित पवार गटाला अर्थात सुनील तटकरे यांनाच धक्का देत शरद पवार गटाची वाट धरली.
advertisement
NCP : अजितदादा पुन्हा पडले भारी, राहुल नार्वेकरांसह पवार काकांना कोर्टाची नोटीस
शरद पवार गटाने अनिल तटकरे यांना मोठी जबाबदारी दिली. त्यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्ष पदी करण्यात आलीय. जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. पक्षाचे रायगड प्रभारी प्रशांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून या नियुक्ती मुळे सुनील तटकरे यांच्या घरातच फूट पडल्याचे दिसून येत आहे. या नियुक्तीवेळी,सुनील तटकरे यांचे पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी आणि विरोधक आलेले शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. ही सर्व खेळी त्यांचीच असल्याचेही बोलले जात आहे. या नियुक्तीमुळे सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
