NCP : अजितदादा पुन्हा पडले भारी, राहुल नार्वेकरांसह पवार काकांना कोर्टाची नोटीस
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Ajit Pawar’s NCP moves Bombay HC : राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाला अजित पवार गटानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्यानतंर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या सुनावणीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचेच असल्याचा निकाल दिला. यासोबत अजित पवार आणि शरद पवार गटाचे कुणीही आमदार अपात्र नाहीत असाही निर्वाळा दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटाच्या आमदारांना या प्रकरणी उच्च न्यायालयाने नोटीस जारी केलीय. अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे. न्यायमूर्ती गिरिश कुलकर्णी यांच्या कोर्टात सुनावणी झाली.
राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाला अजित पवार गटानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. नार्वेकरांनी आपल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याच्या निकालाला याचिकेतून आव्हान देण्यात आलंय.
advertisement
- राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टात न्यायालयीन लढा
- शरद पवार गटाला 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
- राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची जयंत पाटील आणि अनिल देशमुखांविरोधात आहे ही हायकोर्टात याचिका
- न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरोझ पुनिवाला यांच्या खंडपीठानं जारी केल्या नोटिस
- निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी अजित पवारांचीच यावर शिक्कामोर्तब केलंय, तर मग दुसरा गट तयार होण्याचा प्रश्नच उरत नाही
advertisement
- सर्व आमदारांना पक्षाचा आदेश बंधनकारक, मुकुल रोहतगींचा युक्तिवाद
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2024 12:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP : अजितदादा पुन्हा पडले भारी, राहुल नार्वेकरांसह पवार काकांना कोर्टाची नोटीस


