advertisement

India US trade deal: ट्रम्प यांचा पीएम मोदींना फोन, नेमकी काय झाली चर्चा, ट्विट करून सगळंच सांगितलं

Last Updated:

India US trade deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका ट्रेड डीलचे स्वागत केले, ट्रम्प यांनी टॅरिफ ३२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणल्याने IT, फार्मा, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल क्षेत्रांना मोठा फायदा.

News18
News18
जेव्हा जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा फायदा केवळ दोन देशांनाच नाही, तर संपूर्ण जगाला होतो," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका ट्रेड डीलचे स्वागत केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ ३२ टक्क्यांनी कमी करून ते १८ टक्क्यांवर आणल्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांना खास ट्विट
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला. 'मेड इन इंडिया' उत्पादनांवरील टॅरिफ कमी करून तो १८% करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. १४० कोटी भारतीयांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार. ट्रम्प यांचे नेतृत्व जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, भारत त्यांच्या शांतता प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देत आहे."
advertisement
advertisement
भारतीय बाजारासाठी हे 'गिफ्ट' का महत्त्वाचे?
बजेट सादर झाल्यानंतर बाजार एका मोठ्या बूस्टरच्या शोधात होता. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आता ४ मुख्य क्षेत्रांची चांदी होणार आहे. १. आयटी (IT): अमेरिकन कंपन्यांकडून मिळणाऱ्या ऑर्डर्स आता वाढतील. २. फार्मा (औषध निर्मिती): भारतीय औषधांची अमेरिकेतील निर्यात स्वस्त होईल. ३. ऑटोमोबाईल: सुटे भाग आणि वाहनांच्या निर्यातीला मोठी गती मिळेल. ४. टेक्सटाईल (कापड उद्योग): भारतीय कापड उद्योगासाठी अमेरिकेची दारं आता अधिक रुंदावली आहेत.
advertisement
बाजारात 'धमाका' होणार?
तज्ज्ञांच्या मते, या डीलमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा (FII) भारतीय बाजारावरील विश्वास वाढला आहे. "रातोरात झालेली ही घडामोड आज शेअर बाजारात मोठी तेजी घेऊन येऊ शकते. निफ्टी २५,५०० चा टप्पा गाठण्यासाठी आता सज्ज झाला आहे," असे संकेत मिळत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
India US trade deal: ट्रम्प यांचा पीएम मोदींना फोन, नेमकी काय झाली चर्चा, ट्विट करून सगळंच सांगितलं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement