TRENDING:

Loksabha : नारायण राणेंना शेवटच्या बेंचवर बसावं लागलं, ठाकरेंच्या आमदाराची टीका

Last Updated:

नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे इच्छुक होते. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांच्या उमेदवारीवर टीका करताना त्यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली त्यावरून टोला लगावला.
नारायण राणे
नारायण राणे
advertisement

वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांचे नाव भाजपच्या तेराव्या यादीत, पहिल्या बेंचवर बसणारे तुम्ही म्हणता मात्र तुम्हाला शेवटच्या बेंचवर उमेदवारी मिळाली. भाजप पक्षात नारायण राणे यांची ही पात्रता आहे. नारायण राणे यांच्या उमेदवारीचं नाव भाजपच्या तेराव्या यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं. आपण पहिल्या बेंचवर बसणारे राणे स्वतःला सांगतात आणि त्यांचं नाव आता शेवटच्या बेंचवरच्या उमेदवाराच्या यादीमध्ये आला आहे.

advertisement

Ratnagiri Sindhudurg : नारायण राणेंना उमेदवारी, सामंतांची माघार; पत्रकार परिषदेत सांगितलं कारण

किरण सामंत सारखा नवखा उमेदवार समोर असताना त्यांना आता शेवटच्या बेंचवर बसावं लागलं. त्यामुळे राणेची पात्रता महायुती आणि भाजपमध्ये काय आहे हे यावरून दिसून येतं. ज्यांची भाजपा पक्षातच पात्रता नाही तर लोकांमध्ये असण्याची शक्यता कशी व्यक्त करता. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये विनायक राऊत यांचा विजय निश्चित आहे असंही वैभव नाईक यांनी म्हटलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

नारायण राणे यांच्यावर टीका करताना वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांनी उमेदवारी आपल्या मुलांच्या राजकीय करिअर साठी उमेदवारी घेतली आहे. नारायण राणे हे फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या दोन मुलांसाठीच राजकारण करत आहेत. आमचा संघर्ष दहा वर्षासाठी यासाठीच होता की राणेचीच मक्तेदारी का?

मराठी बातम्या/कोकण/
Loksabha : नारायण राणेंना शेवटच्या बेंचवर बसावं लागलं, ठाकरेंच्या आमदाराची टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल