वेळेवर न पोहोचणे
सर्वात मोठी चूक म्हणजे विमानतळावर उशिरा पोहोचणे. डोमेस्टिक फ्लाईटसाठी किमान 2 तास आणि इंटरनॅशनल फ्लाईटसाठी किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचा. चेक-इन आणि सुरक्षा तपासणीसाठी जास्त वेळ लागू शकतो.
बोर्डिंग गेटची वेळ चुकवणे
अनेक एअरलाईन्स फ्लाईट उड्डाणाच्या 20 ते 25 मिनिटे आधी बोर्डिंग गेट बंद करतात. सुरक्षेची तपासणी पूर्ण झाल्यावर लगेच गेटवर पोहोचा. खरेदी करण्यात किंवा खाण्यापिण्यात जास्त वेळ घालवू नका.
advertisement
सामान नियमांकडे दुर्लक्ष
कॅरी-ऑन बॅगमध्ये 100 मिली पेक्षा जास्त लिक्विड, धारदार वस्तू किंवा बंदी असलेले इतर सामान ठेवल्यास सुरक्षा तपासणीला वेळ लागतो आणि वस्तू जप्त होऊ शकतात. एअरलाईनच्या वजनाच्या नियमांचे पालन करा.
प्रवासाचे कागदपत्रे अपूर्ण
पासपोर्ट, व्हिसा किंवा तिकिटावरील नावात किंवा स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक असल्यास, तुम्हाला बोर्डिंग पास नाकारला जाऊ शकतो. सर्व कागदपत्रे तपासा आणि त्यांची झेरॉक्स प्रत जवळ ठेवा.
ऑनलाइन चेक-इन न करणे
वेळेची बचत करण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शक्य असल्यास प्रवासाच्या 24 तास आधी ऑनलाइन चेक-इन करा.
टर्मिनल/गेट न तपासणे
मोठ्या विमानतळांवर टर्मिनल आणि गेट क्रमांक वारंवार बदलू शकतात. तुम्ही योग्य टर्मिनल आणि गेटवर जात आहात की नाही, हे नेहमी डिस्प्ले बोर्डवर तपासा आणि एअरलाईनच्या सूचनांकडे लक्ष द्या.