एकाच वेळी का घ्यायचं व्हिटॅमिन डी आणि के ?
व्हिटॅमिन डी आणि के दोन्ही एकमेकांना पूरक मानले जातात. त्यामुळे जेव्हा दोन्ही जीवनसत्त्वे एकत्र घेतली तरच त्यांचे पूरक फायदे शरीराला मिळतील. जर व्हिटॅमिन के सोबत सप्लिमेंट्ससोबत व्हिटॅमिन डी नाही घेतलं तर व्हिटॅमिन के आणि डी चेही फायदे शरीराला होणार नाहीत. याशिवाय व्हिटॅमिन के चा विपरीत परिणाम शरीरावर होण्याची भीती असते. व्हिटॅमिन डीचा वाईट परिणाम थेट आपल्या किडनी आणि यकृतावर होतो. व्हिटॅमिन डी आणि के चे मिश्रण देखील आपले हृदय निरोगी ठेवते. यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि कोलेस्टेरॉल शिरांमध्ये जमा होण्यापासूनही बचाव होतो.याशिवाय दोन्ही व्हिटॅमिन्सच्या एकत्र घेण्यामुळे पचन सुधारतं त्यामुळे अतिरिक्त वजन वाढण्याची गती मंदावून वजन नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे दोन्ही व्हिटॅमिन्सचे इंजेक्शन एकाचवेळी घेणं शरीरासाठी फायद्याचं ठरतं.
advertisement
जाणून घेऊयात दोन्ही जीवनसत्त्वांचे फायदे
व्हिटॅमिन ‘डी’चे फायदे
व्हिटॅमिन डी हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण कमी करून हाडांना मजबूत करतं. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील फायद्याचं आहे. त्यामुळे विविध आजारांपासून असलेला संक्रमणाचा धोका टळतो. व्हिटॅमिन डी हे कॅन्सर आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायद्याचं मानलं गेलंय.
व्हिटॅमिन ‘के’चे फायदे
व्हिटॅमिन के जीवनसत्त्वामुळे पचनक्रिया सुरळीत पार पडते. रक्त पातळ करण्यातही व्हिटॅमिन के महत्त्त्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन के इंसुलिनचे प्रमाण संतुलित करते ज्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहायला मदत होते. व्हिटॅमिन डी सोबत घेतल्यास हाडं मजबूत करण्यातही व्हिटॅमिन के महत्त्वाची भूमिका बजावते.