भारतात भरपूर सूर्यप्रकाश असूनही Vitamin D ची कमतरता का? जाणून घ्या खरी कारणं अन् हे महत्त्वाचे उपाय करा 

Last Updated:

भारतासारख्या सूर्यप्रकाशयुक्त देशातही व्हिटॅमिन डीची कमतरता गंभीर समस्या बनली आहे. सूर्यप्रकाशात वेळ कमी घालवणे, आहारातील कमतरता, गडद त्वचा आणि वायुप्रदूषण ही प्रमुख कारणे आहेत. उपाय म्हणून नियमित सूर्यप्रकाश, संतुलित आहार आणि तपासणी यावर भर दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते. 

News18
News18
व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे शरीरात कॅल्शियमसह अनेक पोषक घटक शोषून घेण्यास मदत करते. जर व्हिटॅमिन डीची कमतरता झाली तर हाडे कमजोर होतात आणि स्नायूंमध्ये ताकद राहत नाही. भारतात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असूनही, बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. एका अभ्यासानुसार, उत्तर भारतातील 91 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, जे चिंताजनक आहे.
advertisement
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची प्रमुख कारणे
सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवणे : बहुतांश लोक आपले वेळापत्रक इतके व्यस्त ठेवतात की सूर्यप्रकाशात वेळ घालवत नाहीत. शहरीकरणामुळे लोक घरातच काम करतात. लहान मुलं शाळा, घर आणि तिथून पुन्हा अभ्यासातच गुंतलेली असतात. यामुळे शरीराला पुरेसा व्हिटॅमिन डी मिळत नाही.
गडद त्वचा : भारतीय लोकांच्या त्वचेचा रंग गडद असल्याने त्यामध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्याची क्षमता कमी असते. गडद त्वचेत जास्त प्रमाणात मेलेनिन असतो, जो त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करतो. त्यामुळे त्वचा व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी जास्त वेळ सूर्यप्रकाशात असणे गरजेचे असते.
advertisement
वायुप्रदूषण : वायुप्रदूषणामुळे हवेतील घाण सूर्यप्रकाशाला थेट जमिनीवर पोहोचू देत नाही. प्रदूषण जास्त असलेल्या ठिकाणी व्हिटॅमिन डीची कमतरता जास्त असते.
आहारातील कमतरता : व्हिटॅमिन डी पुरवणारे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात. फॅटी फिश (सॅल्मन, ट्यूना, मॅकेरेल), अंडीचा पिवळा भाग, मशरूम आणि फोर्टिफाइड फूड यामध्ये व्हिटॅमिन डी असते. मात्र, हे पदार्थ आपल्या आहाराचा भाग कमी वेळा होतात.
advertisement
व्हिटॅमिन डीची कमतरता कशी दूर कराल?
सूर्यप्रकाशाचा फायदा घ्या : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंतचा सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सर्वोत्तम असतो. या वेळेत 10 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाशात घालवा. सूर्यप्रकाशात जाताना कपडे पूर्णपणे झाकलेले नसावेत, याची काळजी घ्या.
घरात सूर्यप्रकाश येण्यासाठी उपाय करा : घर अशा प्रकारे बांधा की रोज पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. घराभोवती झाडे लावा, जेणेकरून प्रदूषणाचा परिणाम कमी होईल.
advertisement
आहारात बदल करा : आहारात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ नियमितपणे समाविष्ट करा. यामध्ये सॅल्मन, ट्यूना, सर्डिन, मॅकेरेल मासे, अंडीचा पिवळा भाग यांचा समावेश करा. शाकाहारी लोकांसाठी फोर्टिफाइड दूध, संत्र्याचा रस, फोर्टिफाइड सीरिअल्स आणि मशरूम फायदेशीर ठरतील.
आरोग्य तपासणी करा : व्हिटॅमिन डीची पातळी नियमित तपासा. पातळी कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
भारतात भरपूर सूर्यप्रकाश असूनही Vitamin D ची कमतरता का? जाणून घ्या खरी कारणं अन् हे महत्त्वाचे उपाय करा 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement