TRENDING:

फॅशनसाठी बेस्ट ऑप्शन! गॅदरिंगला स्वस्तात ड्रेस हवेत? अमरावतीत इथं करा 50 रुपयांपासून खरेदी

Last Updated:

Amravati Shopping: सध्या शाळा आणि महाविद्यालयांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी पारंपरिक आणि इतर फॅशनेबल ड्रेस हवे असतील तर अमरावतीतील हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती: हिवाळ्यात अनेक शाळांमध्ये पारंपरिक दिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तसेच प्रजासत्ताक दिनाला सुद्धा काही शाळांत आवर्जून सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तेव्हा या कार्यक्रमांत विद्यार्थी विविध प्रकारच्या आकर्षक वेशभूषा करत असतात. त्यासाठी पारंपरिक आणि हटके ड्रेसेस हवे असतात. काही वेळा खूप शोधून पण मापात ड्रेस मिळत नाहीत. अशा सर्वांसाठी अमरावतीमधील अंबा स्टोअर हे बेस्ट ऑप्शन असून इथे सर्व प्रकारचे आणि सर्व मापाचे ड्रेस अगदी स्वस्तात मिळतात.

advertisement

अमरावतीमधील अंबा स्टोअरचे मालक निमिश दामानी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, "गेले कित्येक वर्षापासून आम्ही कपड्यांचे काम करतो. लग्नसमारंभ असो की सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाला लागणारे कपडे आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आम्ही कपडे ऑर्डर प्रमाणे शिवून सुद्धा देतो."

एकदाच नव्हे पुन्हा पुन्हा वापरा, प्रजासत्ताक दिनी द्या खास नॅपकिन बुके, किंमत फक्त 40 रुपये!

advertisement

सोहळा सेट अन् नऊवारी 

सोहळे सेट ज्याला तुम्ही लग्नसमारंभ, पूजा विधी आणि इतरही ठिकाणी वापरू शकता. हे ड्रेस इथे होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नऊवारी मधील सर्व पॅटर्न सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. छोट्या साईज पासून ते फुल साईज पर्यंत सर्व साड्या सुद्धा आहेत. त्यानंतर कमांडो ड्रेस, साऊथ इंडियन साडी, कुर्ता सेट हे सर्व कपडे होलसेल रेटमध्ये या दुकानात मिळतात.

advertisement

सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खास ड्रेस

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ड्रेस, मावळ्यांचे विविध ड्रेस आणि टोपी हे सुद्धा परवडेल अशा किमतीमध्ये उपलब्ध आहे. पगडीची किंमत 550 रुपयांपासून सुरू होते. त्यामध्ये साईजनुसार 50 रुपयांनी वाढ होते. लहान मुलांसाठीचे सर्व कपडे त्याचबरोबर नवरदेवसाठी लागणारे पारंपरिक सर्व कपडे आमच्याकडे उपलब्ध आहेत. महिलांसाठी साडी, परकर पोलक, ओढणी हे सुद्धा आहेत. त्याचबरोबर मूर्ती साठी लागणारे ड्रेसेस सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन आणि कलरमध्ये या ठिकाणी मिळतात.

advertisement

50 रुपयांपासून कपडे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू! परंपरेला फाटा, महाराष्ट्रात या कार्यक्रमाचीच चर्चा
सर्व पहा

सर्व प्रकारच्या कपड्यांच्या किमती या त्याच्या कापड, साईज आणि डिझाईननुसार बदलत जातात. आमच्याकडे 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या वस्तू आहेत. तर तिकडे 5 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या सर्व वस्तू ऑर्डर नुसार बनवून दिल्या जातात. तसेच रेडिमेड सुद्धा मिळतात, असे दुकानदार निमिश यांनी सांगितले. हे दुकान अंबादेवी मंदिर जवळ, गांधी चौक येथे आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फॅशनसाठी बेस्ट ऑप्शन! गॅदरिंगला स्वस्तात ड्रेस हवेत? अमरावतीत इथं करा 50 रुपयांपासून खरेदी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल